जगातलं सगळ्यात मोठं हृदय 181 किलोचं! 3 किलोमीटर वरून ऐकू येतात हृदयाचे ठोके, फोटो पाहाच

हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. त्याचे वजन 181 किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो नीट बघा, इतकं मोठं हार्ट तुम्ही कधी पाहिलंय का?

जगातलं सगळ्यात मोठं हृदय 181 किलोचं! 3 किलोमीटर वरून ऐकू येतात हृदयाचे ठोके, फोटो पाहाच
blue whale heart weight
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 16, 2023 | 11:57 AM

जगातलं सर्वात मोठं हृदय तुम्ही पाहिलं आहे का? अर्थात, आपल्याला असे वाटेल की आपले हृदय सर्वात मोठे आहे, परंतु आपले हृदय वजनाने जगातील सर्वात मोठ्या हृदयापेक्षा बरेच लहान आहे. जगातील सर्वात मोठ्या हृदयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मग लोकांनी आपले विचार मांडले. व्हायरल होत असलेला हा फोटो ब्लू व्हेलच्या हार्टचा आहे. हे पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. त्याचे वजन 181 किलो असल्याचे सांगण्यात येत आहे. हा फोटो नीट बघा, इतकं मोठं हार्ट तुम्ही कधी पाहिलंय का?

बिझनेसमन हर्ष गोएंका यांनी ब्लू व्हेलच्या हृदयाचा हा फोटो आपल्या ट्विटर पेजवर शेअर केला आहे. त्यांनी फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे ब्लू व्हेलचे हृदय आहे, ज्याचे वजन 181 किलो आहे. त्याची रुंदी 1.2 मीटर आणि लांबी 1.5 मीटर आहे. त्याच्या हृदयाचे ठोके 3.2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून ऐकू येतात”, असेही ते म्हणाले. गोएंका यांनी शेअर केलेला हा फोटो कॅनडाच्या रॉयल ओंटारियो म्युझियममध्ये जतन केलेल्या ब्लू व्हेलच्या हृदयातील आहे.

गोएंका आपल्या सोशल मीडियावर मनोरंजक पोस्ट शेअर करण्यासाठी ओळखले जातात. हा फोटो त्याने आपल्या ट्विटर पेजवर शेअर करताच तो व्हायरल झाला. देवाची रचना किती सुंदर आहे, असे काहींनी म्हटले, तर काहींनी ते हृदय आहे की बॉम्बचा गोळा आहे असे म्हटले.