AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पावसाचा मोठा अलर्ट, थेट इशारा, तब्बल इतक्या राज्यांमध्ये…

देशातील वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहेत. काही राज्यात पाऊस तर काही राज्यात उकाडा आणि थंडी अशी परिस्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला आहे.

5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी पावसाचा मोठा अलर्ट, थेट इशारा, तब्बल इतक्या राज्यांमध्ये...
Rain
| Updated on: Feb 05, 2026 | 7:24 AM
Share

राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. पण राज्यात थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. थंडी, पाऊस आणि उकाडा असा तिन्ही ऋतू अनुभवता येत आहेत. राज्यात उकाडा वाढण्याचे संकेत आहेत. डिसेंबर महिन्यात थंडी कायम राहिली. मात्र, 1 जानेवारी 2026 रोजी झालेल्या पावसानंतर राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. दुसरीकडे उत्तरेकडे पारा सातत्याने घसरताना दिसत आहे. हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर थेट घातक परिणाम होताना दिसत आहे. यासोबतच वाढलेले वायू प्रदूषण ही मोठी समस्या आहेच. थंडी राज्यातून गायब झाली पण वायू प्रदूषण अजूनही कायम आहे. आज दिवसभर राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. ढगाळ वातावरणासोबत उकाडाही वाढण्याचे मोठे संकेत आहेत.

हरियाणाच्या हिस्सारमध्ये देशातील कमी तापमानाची नोंद झाली. हिस्सारमध्ये 4.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सध्या केरळ समुद्रकिनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. धुळ्यात राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. धुळ्यात 10.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. रत्नागिरीत 34.8 अंश सेल्सिअसची नोंद झाली.आज दिवसभरात तापमानात चढउतार बघायला मिळेल.

भारतीय हवामान विभागाने 5,6 आणि 7 फेब्रुवारीला अनेक राज्यामध्ये पावसाचा इशारा जारी केला. मॉन्सून जाऊनही पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. केरळमध्ये पाऊस सुरू आहे. तामिळनाडूमध्ये पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.  हवामान खात्याने 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा इशारा जारी केला आहे.

हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये 5, 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी मुसळधार पाऊस पडेल. हवामान खात्याने जम्मू-काश्मीर, लडाख, पुद्दुचेरी, रायलसीमा, माहे या भागातही पावसाचा इशारा दिला आहे. देशातील काही भागात थंडी, उकडा आणि पाऊस अशी स्थिती आहे. यासोबतच मुंबई आणि दिल्ली येथील वायू प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

Follow Us
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश