Dog Viral Video: कुत्र्यासोबत लपाछपी! कळतंय की कुत्र्याला सगळं, राज्य आल्यावर बघा कसं करतंय…नेटकरी प्रेमात!

लहान मुलगी आणि तिचा पाळीव कुत्रा खेळतानाचा हा व्हिडिओ तेन्सू योगेन नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, लपाछपीचा (Playing Hide And Seek) खेळ खेळणारा बेस्ट फ्रेंड.

Dog Viral Video: कुत्र्यासोबत लपाछपी! कळतंय की कुत्र्याला सगळं, राज्य आल्यावर बघा कसं करतंय...नेटकरी प्रेमात!
Dog viral video
Image Credit source: Social Media
| Updated on: Aug 13, 2022 | 3:44 PM

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाळीव कुत्रा एका लहान मुलीसोबत लपाछपी खेळत आहे. हा व्हिडिओ आश्चर्यकारक आहे कारण कुत्रा मुलीने दिलेल्या प्रत्येक सूचनेचे पालन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर कुत्र्याला (Dog Viral Video) त्या मुलाची भाषा समजते की काय असं वाटतं. व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. लहान मुलगी आणि पाळीव कुत्रा लपंडाव खेळत असल्याच्या व्हिडिओवर युझर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. लहान मुलगी आणि तिचा पाळीव कुत्रा खेळतानाचा हा व्हिडिओ तेन्सू योगेन नावाच्या ट्विटर युजरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, लपाछपीचा (Playing Hide And Seek) खेळ खेळणारा बेस्ट फ्रेंड.

अशा प्रकारे पाळीव कुत्र्याने मुलीसोबत लपाछपी खेळली

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, मुलगी आधी आपल्या पाळीव कुत्र्याला सांगते की, चला लपाछपी खेळूया. त्यानंतर ती कुत्र्याला भिंतीवर जाऊन दुसऱ्या बाजूला तोंड करून डोळे बंद करण्यास सांगते. मग ती मुलगी खोलीत जाऊन लपून बसते. त्यानंतर मुलगी कुत्र्याला तिला शोधण्यासाठी बोलावते. त्यानंतर कुत्रा खोलीत जाऊन मुलगी शोधतो.

व्हिडीओ

अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली

या व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युझरने लिहिले की, माझ्याकडेही एक कुत्रा आहे. त्यांच्यासोबत लपाछपी खेळण्यात खूप मजा येते. विशेष म्हणजे, या चिमुकली आणि कुत्र्याच्या या व्हिडिओवर आतापर्यंत 19 लाखांहून अधिक लोकांनी लोकांना पाहिलं आहे. त्याचबरोबर 54 हजारांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. याशिवाय 7 हजार 600 हून अधिक लोकांनी ते रिट्विट केलं आहे.