Earth Like Planet Discovered: पृथ्वीसारखा ग्रह सापडला; पाणी-ढग आढळल्याचे हा ग्रह राहण्यायोग्य असल्याचा संधोधकांचा दावा

दिल्ली : ब्रह्मांड हे अनेक रहस्यांचे भांडार आहे. यामुळेच मानवाला नेहमीच याबद्दल आकर्षण राहिले आहे. मात्र, आकर्षणाच्या पलीकडे जाऊन मानव ब्रह्मांडात नव विश्व तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. यातूनच खगोलीय शोध आणि निष्कर्षांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ नव नवीन ग्रहांचा शोध घेत आहेत. ब्रह्मांडात पृथ्वीसारखा ग्रह(Earth-like planet discovered) सापडला आहे. येथे पाणी-ढग असल्याचा दावा देखील केला जात आहे. […]

Earth Like Planet Discovered: पृथ्वीसारखा ग्रह सापडला; पाणी-ढग आढळल्याचे हा ग्रह राहण्यायोग्य असल्याचा संधोधकांचा दावा
वनिता कांबळे

|

Jul 20, 2022 | 9:35 PM

दिल्ली : ब्रह्मांड हे अनेक रहस्यांचे भांडार आहे. यामुळेच मानवाला नेहमीच याबद्दल आकर्षण राहिले आहे. मात्र, आकर्षणाच्या पलीकडे जाऊन मानव ब्रह्मांडात नव विश्व तयार करण्याच्या प्रयत्नात आहे. यातूनच खगोलीय शोध आणि निष्कर्षांच्या माध्यमातून शास्त्रज्ञ नव नवीन ग्रहांचा शोध घेत आहेत. ब्रह्मांडात पृथ्वीसारखा ग्रह(Earth-like planet discovered) सापडला आहे. येथे पाणी-ढग असल्याचा दावा देखील केला जात आहे. यामुळेच हा ग्रह राहण्यायोग्य असल्याचा दावा देखील संधोधकांकडून करण्यात येत आहे.

जेम्स वेब टेलिस्कोपने शोधला पृथ्वीसारखा ग्रह

जेम्स वेब टेलिस्कोपने हा पृथ्वीसारखा ग्रह शोधून काढला आहे. या ग्रहाचे नाव गॅस जॉयंट “WASP-96b’असे ठेवण्यात आले आहे. ग्रहापासून बाहेर पडत असलेल्या प्रकाश तरंगांचा अभ्यास केला असता सकारात्मक माहिती हाती लागली आहे. निरीक्षणा दरम्यान या ग्रहावर तेथे पाणी आणि ढग असल्याचे निष्पन्न झाले. याशिवाय हा ग्रह इतका उष्ण आहे की, तेथे जीवन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच येथे पृथ्वीसारखेच पोषक वातावरण आणि गुरुत्त्वाकर्षण असणार आहे.

काही दिवसांनंतर जेम्स वेब टेलिस्कोप आपले डोळे TRAPPIST-1e च्या दिशेने फिरवणार आहे. असेही म्हटले जात आहे की, हा ग्रह पृथ्वीच्या आकाराचा असून तो राहण्यायोग्य आहे. मात्र, तो पृथ्वीपासून तब्बल 39 प्रकाशवर्षे इतक्या प्रदीर्घ अंतरावर आहे. जेम्स वेब हा टेलिस्कोप थेट जीवनाचा शोध घेऊ शकत नसला तरी जीवनाच्या शक्यतांचा निश्चितपणे वेध घेण्यास सक्षम आहे.

ब्रह्मांडात जीवनाची शक्यता असलेले असंख्य खगोलीय पिंड असल्याचा दावा

ब्रह्मांडात जीवनाची शक्यता असलेले असंख्य खगोलीय पिंड असू शकतात. मात्र त्यांना शोधण्याची गरज आहे. ब्रह्मांडाचे अत्यंत स्पष्ट चित्र कॅमेराबद्ध करणारे ‘जेम्स वेब टेलिस्कोप’ आता जीवनाची शक्यता असलेल्या खगोलीय पिंडांचा शोध घेत आहेत. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, सूर्य व अन्य ताऱ्यांच्या भोवती फिरत असलेल्या बाह्यग्रहांवर जीवनाची शक्यता असू शकते.

इतर ग्रहावरील जीवन पृथ्वीपेक्षाही अतिप्राचीन असल्याची शक्यता

कदाचित तेथील जीवन आपल्या पृथ्वीपेक्षाही अतिप्राचीन असू शकते. सैद्धांतिक गणनेनुसार आकाशगंगांमध्ये सुमारे 30 कोटी ग्रह राहण्यायोग्य असू शकतात. यापैकी अनेक खगोलीय पिंड पृथ्वीपासून 30 प्रकाशवर्षे इतक्या अंतरावर असू शकतात. आतापर्यंत केवळ 5 हजार बाह्यग्रहांचा शोध लागला आहे. यातील अनेक बाह्यग्रहांवर राहता येऊ शकते, तसेच तेथे जीवन असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें