बाई बाई…आजीबाई! “आधी पैसे घे” म्हणून दम भरला, अशी भांडली की शेवटी कंडक्टरने हारच मानली…

कधी इतर मजेशीर गोष्टींमुळे व्हायरल होतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आजी बस कंडक्टरशी भांडण करतीये.

बाई बाई...आजीबाई! आधी पैसे घे म्हणून दम भरला, अशी भांडली की शेवटी कंडक्टरने हारच मानली...
Viral video bus conductor and elder lady
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 30, 2022 | 5:41 PM

ज्येष्ठ व्यक्तींचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. अनेक वेळा ते लहान मुलांसोबत खेळत राहतात, तर कधी इतर मजेशीर गोष्टींमुळे व्हायरल होतात. एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक आजी बस कंडक्टरशी भांडण करतीये. बस कंडक्टर तिच्याकडून प्रवासाचं भाडं आकारत नसल्यामुळे त्यांच्यात ही झटापट सुरु झालीये. ही घटना तामिळनाडूतील कोईम्बतूरमधील आहे. कंडक्टर आणि आजी यांच्यात तामिळ भाषेत संभाषण सुरु आहे. भाडं भरण्यासाठी या आजीबाई त्याच्याशी भांडत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत फुकट प्रवास करायला तयार नसल्याने ही वृद्ध महिला वाद घालतीये. कंडक्टर त्यांना फुकट प्रवास करण्यास सांगतोय.

तामिळनाडूमध्ये व्हाइट बोर्ड असलेल्या सरकारी बसमध्ये महिलांना मोफत प्रवासाची सुविधा मिळालीये. या भागात ही महिला मधुकराई ते पालथुराई दरम्यान धावणाऱ्या सरकारी बसमधून प्रवास करत होती.

व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओमध्ये कंडक्टर पुरुष प्रवाशाला तिकीट खरेदी करण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. मग त्या वृद्ध महिलेने त्याला गाठून तिकीट देण्यास सांगितले आणि त्यासाठी पैसे देण्यास सुद्धा सुरुवात केली.

सुरुवातीला कंडक्टरने तिच्याकडून पैसे घेण्यास नकार दिला आणि तिला समजावून सांगितले की, तिला प्रवासासाठी पैसे देण्याची गरज नाही.

मात्र फुकट प्रवास करणार नसल्याचे या महिलेने स्पष्ट केले. इतकंच नाही तर पैसे देताना तिने त्याचाशी चांगलच भांडण केलं.अखेर कंडक्टरने या महिलेसमोर हार मानली आणि त्याने काही पैसे घेऊन तिला तिकीट दिले.