Video : हततीच्या! हत्तीने हत्तीला आणले नियंत्रणात; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही दंग व्हाल!

| Updated on: Jun 14, 2021 | 11:38 AM

प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रशिक्षित हत्ती दुसर्‍या अनियंत्रित हत्तीवर नियंत्रण आणताना दिसत आहे.

Video : हततीच्या! हत्तीने हत्तीला आणले नियंत्रणात; व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही दंग व्हाल!
हत्ती
Follow us on

मुंबई : प्राण्यांचे वेगवेगळे व्हिडीओ नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. मात्र, यावेळी एक वेगळाच व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एक प्रशिक्षित हत्ती दुसर्‍या अनियंत्रित हत्तीवर नियंत्रण आणताना दिसत आहे. मुळात तामिळ भाषेमध्ये प्रशिक्षित हत्तीला कुमकी असे म्हटंले जाते. विशेष म्हणजे एखाद्या हत्ती अनियंत्रित झाल्यानंतर प्रशिक्षित हत्ती त्याला नियंत्रणात आणतो. (Elephant Control wild tusker Video Viral Social Media)

भारतीय वनसेवा अधिकारी सुधा रामेन (Sudha Ramen) यांनी सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. सुरुवातीला आयएफएस अधिकारी प्रवीण अंगुसामी यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतरच हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, एक हत्ती अनियंत्रित झाला आणि तो सैरावैरा पळत आहे. अनियंत्रित हत्तीचे ते रूप बघून अंगाला काटा येतो. त्यानंतर एक प्रशिक्षित हत्ती त्याला कशाप्रकारे नियंत्रणात आणत आहे.

सुधा रामेन यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की, प्रशिक्षित कुमकी हत्ती हा अनियंत्रित हत्तीला कसे नियंत्रित करतो हे तुम्ही कधी बघितले आहे का? या व्हिडिओमध्ये पाहा वन्यवासी अशा प्रत्येक ऑपरेशनमध्ये किती जोखीम आणि आव्हाने घेतात. खरं तर, वन्यजीव व्यवस्थापन सर्वात आव्हानात्मक व्यवसाय आहे. कुडोस टू कर्नाटक एफडी, सुधा रामेन म्हणाल्या की, अशा कामांसाठी काळजीपूर्वक नियोजन आणि समन्वय आवश्यक आहे.

वन कामगार, पशुवैद्य आणि कर्मचारी यांच्या एका युनिटने हे काम केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 30.1k पेक्षा जास्त लोकांनी बघितले आहे, तर हजाराहून अधिक लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ आपल्या सोशल मिडियावर शेअर करत वन अधिकाऱ्यांचे काैतुकही केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

Video | मांस खाण्यासाठी दोघांची चढाओढ, बिबट्याचा मास्टरस्ट्रोक एकदा पाहाच

Viral Video : ‘ढल गया दिन हो गई शाम’गाण्यावर जवानांची परेड, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ

(Elephant Control wild tusker Video Viral Social Media)