Video : 6 वर्षाच्या चिमुकलीचे क्रिकेट शॉट्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, केरळच्या महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

केरळच्या कोझिकोडची रहिवाशी महक फातिमा आपल्या क्रिकेटींग शॉट्समुळे चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. फातिमाचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पाहून ती केवळ सहा वर्षांची आहे यावर विश्वासच बसत नाही.

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीचे क्रिकेट शॉट्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, केरळच्या महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल
महक फातिमा क्रिकेट खेळताना

कोझिकोड : अनेकदा लहान मुलं अशी काही कामं करतात जी मोठ्यांनाही जमत नाही. असंच काहीसं काम केरळमधील सहा वर्षाच्या महक फातिमाने केलं आहे. कोझिकोडमध्ये राहणाऱ्या महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. फातिमा ज्याप्रमाणे क्रिकेटींग शॉट्स खेळते ते पाहून मोठे मोठे क्रिकेटरपण हैरान होतील. महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओचं भरभरुन कौतुक करत आहेत. (Kerlas 6 years old Mehak Fathima Playing Awsome Cricket Shots Shocked Everyone Video gets Viral)

भावाला पाहून खेळण्याची इच्छा

केरळच्या कोझिकोड येथे राहणाऱ्या महक फातिमाचं वय सध्या अवघं 6 वर्ष आहे. पण तिची बॅटिंग करायची शैली वयाच्या तुलनेने खूप भारी आहे. अंत्यत कमी वयात क्रिकेट खेळणारी फातिमामध्ये क्रिकेट खेळण्याची इच्छा तिच्या वडिलांना तिच्या तीन वर्षाच्या भावाबरोबर क्रिकेट खेळताना पाहून जागी झाली. तेव्हा तिने वडिलांना ‘मलाही बॅटिंग शिकवा’ अशी मागणी करताच वडिलांनी तिच्या हातात बॅट देत तिला क्रिकेट खेळायला शिकवले. ज्यानंतर आता तिची बॅटिंग पाहून तिचे वडिलही चकीत झाले आहेत.

पाहा व्हिडीओ – 

 

View this post on Instagram

 

A post shared by The Better India (@thebetterindia)

नेटकऱ्यांकडून भरभरुन प्रेम

महकचा बॅटिंग करतानाचा व्हिडीओ the better india ने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.या व्हिडीओत महक नेटप्रॅक्टिस करताना अप्रतिम क्रिकेट शॉट्स खेळत आहे. फातिमा एकही चेंडू मिस करत नसल्याचं व्हिडीओत दिसतंय. ही क्लिप इंटरनेटवर तुफान व्हायर होत असून अनेक नेटकरी याला लाईक, कमेंट करत शेअर करत आहेत.

हे ही वाचा : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Kerlas 6 years old Mehak Fathima Playing Awsome Cricket Shots Shocked Everyone Video gets Viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI