AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ

सध्या व्हायरल होत असलेला एक व्हिडीओसुद्धा एका शिकारीचाच आहे. या व्हिडीओमध्ये एका सिंहाने रानडुकराची अतिशय थरारक पद्धतीने शिकार केली आहे. या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video | सिंहाच्या जबड्यात रानडुकराची तडफड, पाहा शिकारीचा थरारक व्हिडीओ
LION AND PIG FIGHT VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 4:41 PM
Share

मुंबई : जंगलातील प्राण्यांच्या जगण्याबद्दल आपल्या सर्वांनाच उत्सुकता असते. ते कसे आणि कुठे राहत असतील ? काय खात असतील ? याविषयी सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. याच कारणामुळे प्राणी तसेच पक्ष्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यातील अनेक व्हिडीओ हे शिकारीचे असतात. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओसुद्धा एका शिकारीचाच आहे. या व्हिडीओमध्ये एका सिंहाने रानडुकराची अतिशय थरारक पद्धतीने शिकार केली आहे. या शिकारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Lion hunting brutal attack on Pig for food video goes viral on social media)

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा सिंहाने केलेल्या शिकारीचा आहे. त्याने अतिशय थरारक पद्धतीने एका रानडुकराची शिकार केली आहे. सिंहाने रानडुकराला आपल्या जबड्यात पकडले आहे. जंगलाच्या राजाने बलशाली रानडुकरासोबत केलेली लढाई ही पाहण्यासारखी आहे.

गाफिल रानडुकरावर सिंहाचा हल्ला

व्हिडीओमधील सिंहाला अतिशय भूक लागल्याचं दिसतंय. पोटात कावळे ओरडत असल्यामुळे सिंह शिकार शोधतो आहे. या शोधादरम्यान त्याला एका झाडाखाली रानडुक्कर बसल्याचे समजतेय. त्यानंतर व्हिडीओतील सिंह रानडुकरावर चाल करुन गेला आहे. मस्तपैकी पहुडलेल्या रानडुकरावर या सिंहाने अचानकपणे हल्ला केला आहे. काही समजायच्या आत सिंहाने रानडुकराला आपल्या जबड्यात पकडले आहे. सिंहाच्या कचाट्यात सापडल्यानंतर स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी रानडुक्कर शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे दिसतेय. मात्र, सिंहाने आपल्या जबड्यात पकडल्यामुळे सुटका करुन घेण्यात रानडुक्कर अयशस्वी झालं आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by hayat_vahsh (@hayat_vahshii)

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळाली नाही. मात्र, या व्हिडीओला hayat_vahshii नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलं आहे. व्हिडीओला शेअर केल्यानंतर लोक शिकारीचा थरार पाहून चकित झाले आहे. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून त्याला लाईकसुद्धा करत आहेत.

इतर बातम्या :

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीचे क्रिकेट शॉट्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, केरळच्या महकचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video | मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाची करामत, लावलं ‘असं’ डोकं की एका सेकंदात जागा मिळाली, व्हिडीओ व्हायरल

Video | लग्नाची धामधूम, नातेवाईकांची गर्दी, भर मंडपात नवरी का रुसली ? पाहा व्हायरल व्हिडीओ

(Lion hunting brutal attack on Pig for food video goes viral on social media)

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.