Video | मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाची करामत, लावलं ‘असं’ डोकं की एका सेकंदात जागा मिळाली, व्हिडीओ व्हायरल

प्रवासादरम्यान, बसण्यासाठी सीट मिळावे म्हणून लोक अनेक युक्त्या वापरतात. सध्या अशाच एका नामी युक्तीचा व्हिडीओ सोशल मीड्यावर व्हायरल होत आहे.

Video | मेट्रोमध्ये सीट मिळवण्यासाठी तरुणाची करामत, लावलं 'असं' डोकं की एका सेकंदात जागा मिळाली, व्हिडीओ व्हायरल
train viral video


मुंबई : मोठ्या-मोठ्या महानगरात लोक लोकल मेट्रो ट्रेनने प्रवास करतात. ट्रेनचा प्रवास हा कमी वेळात घरी पोहोचवणारा आणि सुरक्षित प्रवास असल्यामुळे अनेक लोक याच मार्गाचा अवलंब करतात. कदाचित याच कारणामुळे लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. जागा न मिळाल्यामुळे काही लोक उभे राहूनही प्रवास करताना सर्रासपणे दिसतात. या प्रवासादरम्यान, बसण्यासाठी सीट मिळावे म्हणून लोक अनेक युक्त्या वापरतात. सध्या अशाच एका नामी युक्तीचा व्हिडीओ सोशल मीड्यावर व्हायरल होत आहे. (boy applied amazing trick for to get seat in metro train video goes viral on social media)

व्हिडीओमध्ये काय आहे ?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये काही प्रवासी बसलेले तर काही उभे असल्याचे दिसतायत. यामध्ये ट्रेनच्या एका पोलजवळ एक करुण उभा आहे. तो ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या समोर काही महिला बसलेल्या आहेत. या महिला निंवातपणे बसल्या असून कामावरुन त्या घरी जात असाव्यात. मात्र, यावेळी बाजूच्या पोलजवळ उभा असलेल्या या तरुणाला अचानकपणे थरथरायला लागतंय.  काही वेळानंतर त्याचं थरथरणं एवढं वाढतं की तो आता खाली पडतोय की काय असेही आपल्याला वाटून जाते. त्याच्या डोळ्यावरचा चस्मासुद्धा खाली पडल्याचे या व्हिडीओमध्ये दिसतेय.

जागा मिळताच तरुण आरामात बसला

तरुणाला थरथरत असलेले पाहून समोर बसलेल्या महिला या चांगल्याच घाबरल्या आहेत. तरुणाला थरथरायला लागल्यानंतर या महिला लगेचच आपल्या जागेहून उठल्या आहेत. त्यानंतर या तरुणाचे थरथरणे संपले असून तो रिकाम्या झालेल्या सीटवर आरामात बसतोय. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ :

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, त्याला Mohd Rizwan या व्यक्तीने फेसबूकवर अपलोड केले आहे. हा व्हिडीओ अपलोड करताच लोक यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. कोणी बसायला जागा दिली नाही तर काही लोक अशा प्रकारे करामत करतात. अशा प्रकारे नाटक केल्यामुळे लगेचच जागा मिळते, अशी मजेदार प्रतिक्रिया एका नेटकऱ्याने दिली आहे. तर ट्रेनमध्ये जागा मिळवण्याचा हा सर्वात चांगला उपाय असल्याचे दुसऱ्या नेटकऱ्याने सांगितले आहे.

इतर बातम्या :

Video | लग्नाची धामधूम, नातेवाईकांची गर्दी, भर मंडपात नवरी का रुसली ? पाहा व्हायरल व्हिडीओ

Video : बुडणाऱ्या हरणाच्या पाडसाला सैनिकाकडून जीवनदान, व्हायरल व्हिडीओने जिंकली सर्वांचीच मनं

Viral Video : घोडेस्वारी पडली महाग, खांबाला टक्कर लागली आणि घडलं असंकाही…

(boy applied amazing trick for to get seat in metro train video goes viral on social media)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI