Viral Video : घोडेस्वारी पडली महाग, खांबाला टक्कर लागली आणि घडलं असंकाही…

एका तरुणाला घोडेस्वारी करताना कसंलच भान राहिलं नाही. त्याला रस्त्यातील खांबही दिसला नसल्याने काय घडलं पाहा या व्हिडीओत

Viral Video : घोडेस्वारी पडली महाग, खांबाला टक्कर लागली आणि घडलं असंकाही...
Horse riding viral video


मुंबई : जगात प्रत्येक व्यक्तीच्या काही अजब इच्छा, वेगळे छंद असतात. प्रत्येकाला त्या पूर्ण करायचा असतात. अशीच घोडेस्वारीची इच्छा असणारा एक तरुण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी घोडेस्वारी करतो. पण घोडेस्वारी करणे  काही सोपे काम नाही. त्यामुळे जोशमध्ये केलेल्या घोडेस्वारीमुळे या तरुणासोबत जे होते ते पाहून कोणीही न शिकता किंवा काळजी न घेता घोडेस्वारी करणारच नाही. या तरुणाचा हा व्हिडीओ चांगालाच व्हायरल होत आहे. (Video of Horse Riding Boy Collides With Pole goes Viral)

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुण घोडेस्वारी करतो आहे. त्याच्या शेजारुनच बाईकस्वारांचा एक ग्रुपही चालला आहे. तो तरुण घोडा चालवण्यात इतका मग्न होते की त्याला समोर रोवलेला खांबही दिसत नाही आणि तो जोरात जाऊन खांबाला धडकतो. जोरात धडकल्यामुळे तरुण थेट घोड्यावरुन खालीच पडतो. हा संपूर्ण व्हिडीओ जास्त क्लियर नसल्याने घोड्याला आणि संबधित तरुणाला किती लागलं आहे. याबद्दल काही अंदाज बांधता येत नाही. या व्हिडीओला पाहून लोक संबधित तरुणाच्या गैरजबाबदारपणाबद्दल त्याला शिव्या घालत आहेत. सोबतच मुलाच्या आणि घोड्याच्या प्रकृतीबद्दल चिंताही व्यक्त केली जात आहे.

हाच तो व्हिडीओ – 

व्हिडीओ तुफान व्हायरल

हा व्हिडीओ 4 जून रोजी राणा अमरप्रताप या व्यक्तीने शेअर केला. तेव्हापासून हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत तीन लाखाहून अधिकजणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच 89 हजार जणांनी हा व्हिडीओ लाइक केला असून 600 हून अधिक जणांनी कमेंट देखील केली आहे. अनेकांनी व्हिडीओ शेअर देखील केला आहे.

संबंधित बातम्या : 

Video | दहा फुटाचा साप चढला विजेच्या खांबावर, शॉक लागल्यामुळे घडला मोठा अपघात, व्हिडीओ व्हायरल

Video | चेहरा झाककेली महिला, एक हात मागे; समोरच्या हतबल तरुणाचं नेमकं काय होणार ?, पाहा संपूर्ण व्हिडीओ

Video | पाणी पिण्यासाठी जीव व्याकूळ, तहानलेल्या हत्तीचा संयम एकदा पहाच !

(Video of Horse Riding Boy Collides With Pole goes Viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI