
सध्या अनेकजण सुट्टीसाठी मालदीवला जाण्याचा प्लॅन करतात. पण खर्च मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेकजण जाणे टाळतात. पण तुम्ही सर्वात स्वस्तामध्ये मालदीवचा आनंद घेऊ शकता.

आज आम्ही तुम्हाला सर्वात कमी खर्चात मालदीवचा आनंद अनुभवायचा असेल तर महाराष्ट्रातील एका ठिकाणाबद्दल सांगणार आहोत, जिथे गेल्यावर मालदीव सारखा नजारा आहे.

आम्ही कोकणातील तारकर्ली बीचबद्दल बोलत आहोत. या बीचवरील पाणी निळ्या रंगाचे असल्यामुळे आणि कमी गर्दी आणि तेथील सौंदर्य हे मालदीवप्रमाणे असल्याने अनेक लोक येथे येतात.

तारकर्ली बीच कोकणातील सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे तुम्हाला बघायला मिळतात.

त्यासोबत तुम्ही येथे बोटिंगसह सूर्योदय आणि सूर्यास्त व्यवस्थित पाहू शकता. शांत आणि कमी गर्दी असणारे हे ठिकाण कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एकदम खास आहे.