
तुर्कस्तानमध्ये 23 एप्रिलला 6.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले असून त्याचा केंद्रबिंदू इस्तंबूलजवळील सिलिवरी येथे आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भीतीपोटी लोकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. आपत्कालीन सेवा सतर्क आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एका न्यूज अँकरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ही भूकंपाचे धक्के बसत असताना बातम्या देतच राहिली.
आशिया आणि युरोपच्या सीमेवर वसलेल्या तुर्कस्तानमध्ये काल दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. हा भूकंप इतका तीव्र होता की, लोकांच्या घरांच्या खिडक्या- दरवाजे फुटू लागले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी होती.
तुर्कस्तानमधील इस्तंबूलजवळील सिवरी येथील मारमारा समुद्रात स्थानिक वेळेनुसार काल दुपारी 12 वाजून 49 मिनिटांनी सुरू झालेल्या या भूकंपाचे धक्के 6.9 किलोमीटर खोलीवर जाणवले. सध्या सोशल मीडियावर एका तुर्की न्यूज चॅनेलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बातमी वाचणाऱ्या अँकरच्या चेहऱ्यावर भूकंपानंतरची दहशत स्पष्ट दिसत आहे. पण, त्याचवेळी ती बातम्या देत आहे. ती थांबलेली नाही. तुम्ही हे दृश्य व्हिडिओमध्ये अगदी स्पष्ट पाहू शकता. आपलं काम भूकंपाच्या भीतीमध्येही या महिला अँकरने सुरू ठेवले आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. इतकंच नाही तर इमारतींच्या नुकसानीबाबतही कोणतीही माहिती समोर येत नाही. अचानक आलेल्या जोरदार धक्क्यांमुळे लोकांमध्ये नक्कीच भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाचे संभाव्य धक्के टाळण्यासाठी अनेक जण मोकळ्या जागेत जमले. तुर्कस्तानमधील आपत्कालीन सेवांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. इस्तंबूल आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. जोरदार थरथरणे, शेल्फमधून सामान पडणे आणि भिंतींना किरकोळ तडे जाणे यासह आपले अनुभव लोकांनी सोशल मीडियावर शेअर केले.
Shaking, trembling — watch the moment a TV presenter in Istanbul nearly breaks down on live air as a powerful quake rocks Istanbul pic.twitter.com/2TAXZRM9DE
— RT (@RT_com) April 23, 2025
भूकंपाचे परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तज्ञ भूकंपाचा अभ्यास करीत आहेत जेणेकरून भविष्यातील घटनांसाठी सुरक्षिततेच्या उपायांमध्ये सुधारणा केली जाऊ शकेल. या भागात भूकंप होणे सामान्य आहे, त्यामुळे पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची आहे. रहिवाशांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा, सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचा आणि संभाव्य भूकंपाच्या धक्क्यांसाठी तयार राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शांत आणि तयार राहणे अशा घटनांदरम्यान जोखीम कमी करण्यास मदत करू शकते.