“तुम्ही भारतातले नंबर वन श्रीमंत व्यक्ती कधी बनणार?” आनंद महिंद्रा यांचं उत्तर व्हायरल…

विक्रांत नावाच्या या युझरने लिहिले की, "सध्या तुम्ही भारतातील ७३ वा सर्वात श्रीमंत माणूस आहात, तुम्ही नंबर वन कधी बनणार?"

तुम्ही भारतातले नंबर वन श्रीमंत व्यक्ती कधी बनणार? आनंद महिंद्रा यांचं उत्तर व्हायरल...
anand mahindra
Image Credit source: Social Media
| Updated on: Dec 11, 2022 | 4:44 PM

आनंद महिंद्रा हे भारतातील एक आघाडीचे उद्योगपती आहेत. सोशल मीडियावरही ते सक्रिय असतात. अनेक लोकांचे मनोबल वाढवत असतात. अनेकदा ते स्वत: आर्थिक दुर्बल लोकांना मदत करताना दिसतात. पण अनेक वेळा त्यांचे सहज केलेले ट्विटही जोरदार व्हायरल होतात. दरम्यान, जेव्हा एका युझरने त्यांना “भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कधी बनणार?” असा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

अलीकडेच ट्विटरवर त्यांचे दहा दशलक्ष फॉलोअर्स होते, म्हणून त्यांनी एक ट्विट लिहून आपल्या फॉलोअर्सचे आभार मानले.

या ट्विटला उत्तर देताना एका युझरने त्यांना हा प्रश्न विचारला. विक्रांत नावाच्या या युझरने लिहिले की, “सध्या तुम्ही भारतातील ७३ वा सर्वात श्रीमंत माणूस आहात, तुम्ही नंबर वन कधी बनणार?”

या ट्विटला उत्तर देताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, ‘सत्य हे आहे की, मी कधीही श्रीमंत होणार नाही कारण ती माझी इच्छा कधीच नव्हती.’

आनंद महिंद्राच्या या उत्तराने अनेक युझर्स खूप प्रभावित झाले आणि त्यांच्या या नम्रतेचे कौतुक करू लागले. या ट्विटवर लोक अनेक प्रतिक्रिया देत आहेत.

आनंद महिंद्रा यांचे ट्विटरवर नुकतेच दहा लाख फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. त्यांनी सर्वांचे आभार मानले. आनंद महिंद्रा दिवसातून अनेक वेळा मजेशीर व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत असतात. सध्या त्याचं हे ट्विट व्हायरल होतंय.