या प्राण्याची एक थाप, धरतीला थरकाप; मादीला आकर्षित करण्यासाठी आणतो भूकंप!

Interesting Fact : जगात अशा काही घटना घडतात की, त्याची नवलाई कायम वाटते. असाच एक इवलासा प्राणी जे काही करतो, त्यामुळे तुम्हाला पण आश्चर्याचा धक्का बसेल. मादीला आकर्षित करण्यासाठी तो जे काही करतो, त्यामुळे जमीन हादरते. जणू भूकंप येतो.

या प्राण्याची एक थाप, धरतीला थरकाप; मादीला आकर्षित करण्यासाठी आणतो भूकंप!
जमिनीला फोडतो घाम
Image Credit source: टीव्ही ९ नेटवर्क
| Updated on: Apr 15, 2025 | 3:59 PM

निसर्गात अनेक रहस्य दडलेली आहेत. पण त्याची माहिती आपल्यातील अनेकांना नसते. या गोष्टी जेव्हा माहिती होतात, तेव्हा अनेक जण हे कसं शक्य आहे, असं म्हणतात. सध्या जगात असं काही घडत असेल यावर आपला विश्वास बसत नाही. पण हा प्राणी मादीला आकर्षित करण्यासाठी जमिनीत कंपण आणतो हे वाचून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. शास्त्रज्ञांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला.

तुम्ही पशू-पक्ष्यांमध्ये मादीला अथवा नराला आकर्षित करण्यासाठी त्यांच्या ना ना तर्‍हा पाहिल्या असतील. पण या पठ्ठ्याचा अंदाज सर्वात हटके आहे. काही प्राणी, पक्षी विशिष्ट प्रकारचा आवाज काढून, हावभाव करत त्याच्या साथीदाराला आकर्षित करतात. पण दक्षिण युरोपमधील हा खेकडा सर्वात वेगळा आहे. तो मादीला आकर्षित करण्यासाठी थेट जमिनीत तरंग तयार करतो. या लहरी इतक्या जबरदस्त असतात की जणू भूकंप आला आहे असे वाटते.

मादी कशी निवडते तिचा जोडीदार?

नर खेकडा मादी खेकड्याला आकर्षित करण्यासाठी जमिनीत विशिष्ट प्रकारची कंपन तयार करतो. ती शक्तिशाली असतात. शास्त्रज्ञांनी ही कंपनं रेकॉर्ड केली. युरोपियन फिडलर खेकडे त्यांच्या मोठ्या पंज्यासाठी जगभर नावाजलेले आहेत. त्यांचा वापर करून ते शक्तीशाली लहरी तयार करतात. शास्त्रज्ञांच्या मते हे खेकडे त्यांचा पंजा जमिनीवर आपटतात. अथवा त्यांचे शरीर जोरजोराने जमिनीवर आपटतात. त्यातून शक्तीशाली कंपनं तयार होतात. जणू या लहरी एखाद्या भूकंपासारख्याच असतात.

या कंपनं किती शक्तिशाली आहेत, त्याआधारे मादा नराच्या क्षमतेचा, ताकदीचा अंदाज बांधतात. त्यानंतर त्यांच्यासाठी योग्य जोडीदार निवडतात. या विषयीचा योग्य अंदाज बांधता यावा यासाठी शास्त्रज्ञांनी 8 हजारांहून अधिक खेकड्यांवर संशोधन केले. कम्युटर्स मशीन लर्निंगचा त्यासाठी वापर करण्यात आला. त्याआधारे खेकड्यांचे कंपन कसे होते, याविषयीची 70 टक्के अचूक माहिती जमा करता आली आहे. या खेकड्यांच्या प्रजनन आणि इतर बाबींविषयी अजुनही संशोधन सुरू आहे. त्यातून अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.