
रेल्वे गाड्यांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामुळे लोक घाबरले होते. एक ट्रेन स्टेशनवर पोहोचणार होती, तिच्या इंजिनवर अचानक आगीचा भपका दिसला. आग दिसल्यावर लोक इकडे तिकडे पळू लागले, घाबरले.त्यांना वाटलं बरीच मोठी आग आहे. पण ही आग तितकी मोठी नव्हती.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ कुठला आणि कधीचा आहे, याची माहिती मिळालेली नाही. वाफेच्या इंजिनावर धावणारी रेल्वे, स्टेशन गाठत असल्याचं पाहायला मिळतंय.
इतक्यात ट्रेनच्या इंजिनमधून अचानक धुराच्या लोट बाहेर येतात. आगीचा भपका बघून अनेकजण घाबरतात. व्हिडिओ पाहून असे वाटते की जणू ट्रेनच्या इंजिनला आग लागलीये.
इंजिनच्या जळत्या कोळशातून ही आग लागल्याचं दिसतं आणि अचानक काळा धूर बाहेर आल्याचं दिसतं. काही मुलंही या व्हिडीओमध्ये दिसत आहेत, ज्यांना वाटतं की आग लागलीये. पण दुसऱ्याच क्षणी हा धूर गायब होतो आणि ट्रेन आपल्याच वेगाने धावत राहते.
काही लोक हा व्हिडीओ खूप जुना असल्याचं म्हणतायत. रेल्वे गाड्या व्हायरल होण्याची ही पहिली घटना नाही. काही महिन्यांपूर्वी पाकिस्तानातून आलेल्या एका रेल्वे चालकाने दही खरेदी करण्यासाठी ट्रेन थांबवली होती हा व्हिडीओ सुद्धा प्रचंड व्हायरल झालेला.
लाहोरमधील एका रेल्वे स्थानकाजवळ कचोरी खाण्यासाठी रेल्वे चालकाने गाडी थांबवली होती, त्यावेळी सुद्धा एकच खळबळ उडाली होती. सध्या इंजिनला लागलेल्या आगीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.