आवडीने मासा खायला गेला तितक्यात…

| Updated on: Nov 27, 2022 | 1:10 PM

होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बघून कदाचित तुमची मासे पाहायची इच्छाच निघून जाईल.

आवडीने मासा खायला गेला तितक्यात...
fish served
Image Credit source: Social Media
Follow us on

आज जग जरी शाकाहाराकडे वेगाने वाटचाल करत असले तरी आजही माशांच्या सेवनासह मांसाहारी पदार्थ खाणारे लाखो-अब्जांश लोक आहेत. कदाचित तुम्हाला मासे खायलाही आवडतात. ज्यांना मासे कसे बनवायचे हे माहीत आहे, ते घरी मासे बनवून आरामात जेवतात. पण ज्यांना माहिती नाही, त्यांच्यासाठी हॉटेल किंवा रेस्तराँ वगैरे सोडून पर्याय नसतो. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये कधीतरी मासेही खाल्ले असतील, पण तुमच्या ताटात दिलेला मासा अचानक जिवंत झाला तर? होय, असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो बघून कदाचित तुमची मासे पाहायची इच्छाच निघून जाईल.

ताटात सर्व्ह केलेला मासा अचानक जिवंत होतो आणि तोंड उघडतो. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, प्लेटमध्ये सॅलडसोबत काही मासेही सर्व्ह केले जातात.

असे दिसते की मासे चांगल्या प्रकारे स्वच्छ केले गेले आहेत आणि प्लेटमध्ये सर्व्ह केले गेले आहेत. ग्राहक प्लेट मध्ये असलेल्या एका माशाच्या तोंडाजवळ चॉपस्टिक लावतो मासा अचानक तोंड उघडून चॉपस्टिक तोंडात पकडतो.

मग तो मासा ती चॉपस्टिक सोडण्याचं नाव घेत नाही. त्याने चॉपस्टिकला तोंडाने धरून ठेवले होते जणू काही त्याने आपली एक शिकार पकडली आहे.

हा एक आश्चर्यकारक व्हिडिओ आहे. ताटात सर्व्ह केलेला मासा जिवंत झाला असे क्वचितच तुमच्यासोबत घडले असेल. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @OTerrifying नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केलेल्या माशाने चॉपस्टिकच खायला सुरुवात केली’. 12 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5.4 मिलियन वेळा पाहिला गेला आहे, तर 1 लाख 15 हजारांहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने म्हटले आहे की, हा मासा एलियन म्हणूनही ओळखला जातो, जो जपानचा ‘लोकप्रिय स्थानिक मासा’ आहे, परंतु काही जपानी लोक ते खातात, परंतु असे म्हटले जाते की ते खूप स्वादिष्ट आहे.