
आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत यूट्यूब एक मोठं व्यासपीठ झालं आहे. अनेक लोक इथे आपलं टॅलेंट दाखवतात आणि चांगली कमाईही करतात. पण स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर जर सब्स्क्रायबर्स वाढत नसतील, तर निराश होण्याची गरज नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं चॅनल लोकप्रिय करू शकता आणि सब्स्क्रायबर्ससोबतच लाईक्स आणि कमेंट्सही झपाट्याने वाढवू शकता.
सर्वात आधी, चांगल्या दर्जाचा कंटेंट तयार करणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या व्हिडीओची चित्रफीत स्वच्छ असली पाहिजे आणि आवाज स्पष्ट हवा. सोप्या भाषेत आणि रंजक पद्धतीने माहिती मांडली, तर लोक तुमचे व्हिडीओ शेवटपर्यंत पाहतात.
दररोज किंवा आठवड्याच्या ठराविक दिवशी व्हिडीओ अपलोड करणं गरजेचं आहे. सातत्य असेल तरच प्रेक्षकांचा तुमच्यावर विश्वास बसतो आणि सब्स्क्रायबर्स वाढतात.
याशिवाय, व्हिडीओ अपलोड करताना योग्य टायटल, आकर्षक थंबनेल आणि चपखल कीवर्ड्स वापरणंही तितकंच महत्त्वाचं आहे. थंबनेल रंगीत, लक्ष वेधणारं असलं पाहिजे आणि टायटल वाचूनच लोकांना उत्सुकता निर्माण झाली पाहिजे.
आजच्या घडीला यूट्यूब शॉर्ट्स फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. छोटे आणि झटपट समजणारे व्हिडीओ बनवा, ते पटकन व्हायरल होतात आणि त्यामुळे तुमचे सब्स्क्रायबर्सही वाढतात.
यूट्यूबच्या कम्युनिटी टॅबचा वापर करून दररोज छोटे अपडेट्स, पोल्स किंवा प्रश्न शेअर करा. यामुळे लोकांशी नातं जुळतं आणि चॅनलवरची गुंतवणूक वाढते.
इतर यूट्यूबर्ससोबत सहकार्य केल्यास, त्यांच्या प्रेक्षकांपर्यंतही तुमचा पोहोच होतो. त्यामुळे नवीन लोक सहज तुमचं चॅनल पाहतात आणि सब्स्क्राईब करतात.
सोशल मीडियावर तुमचे व्हिडीओ शेअर करणं विसरू नका. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ क्लिप्स पोस्ट करा आणि यूट्यूब लिंक द्या. यामुळे नवे प्रेक्षक सहज जोडले जातात.
लाइव्ह स्ट्रीमिंग केल्यास प्रेक्षकांशी थेट संवाद साधता येतो. सुपरचॅटच्या माध्यमातून कमाईही वाढते. शिवाय, ट्रेंडिंग विषयांवर व्हिडीओ तयार केल्यास लोकांचे लक्ष पटकन वेधलं जातं.