AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : घरात पडलाय हजारो विंचवांचा खच, व्हीडिओ पाहून डोकं चक्रावून जाईल…

हा 15 सेकंदाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये दिसणारे विंचू ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या टिटियस सेरुलेटस प्रजातीचे असल्याचं बोललं जातंय.

Video : घरात पडलाय हजारो विंचवांचा खच, व्हीडिओ पाहून डोकं चक्रावून जाईल...
विंचवाचा खच
| Edited By: आयेशा सय्यद | Updated on: May 13, 2022 | 4:33 PM
Share

मुंबई : आपल्या घरात एखादा विंचू (Scorpion) निघाला तर सगळ्यांची घाबरगुंडी उडते. काय करावं कुणाला सुचत नाही. पण घरात जर हजारो विंचू असतील तर… याची कल्पनाही न केलेली बरी. पण सध्या सोशल मीडियावर एका व्हीडिओनं धुमाकुळ घातलाय. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये (Viral Video) हजारो विंचू जमिनीवर, भिंतीवर आणि घराच्या छतावर दिसत आहेत. हा व्हीडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

विंचवांचा खच

सध्या सोशल मीडियावर एका व्हीडिओनं धुमाकुळ घातलाय. व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये हजारो विंचू जमिनीवर, भिंतीवर आणि घराच्या छतावर दिसत आहेत. हा व्हीडीओ कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र व्हीडिओ पाहून अनेकांना धक्का बसलाय.

हा 15 सेकंदाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हीडिओमध्ये दिसणारे विंचू ब्राझीलमध्ये आढळणाऱ्या टिटियस सेरुलेटस प्रजातीचे असल्याचं बोललं जातंय. हे विंचू पार्थेनोजेनिक आहेत. त्यामुळे हा व्हीडिओ ब्राझीलमधला असल्याचं बोललं जातंय.

हा व्हीडिओ oddlyterrifying या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आता हजारो लोकांनी पाहिलं आणि लाईक केलंय. तसंच त्यावर दोन हजार लोकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. एकाने म्हटलंय की, “बापरे! अंगावर काटा आणणारा हा व्हीडिओ आहे.” तर दुसरा म्हणतो, ” हा व्हीडिओ पूर्ण पाहण्याची माझी हिंमत नाही. मला विंचवांची भिती वाटते एवढे सगळे विंचू एकत्र आले कसे?” आणखी एका नेटकऱ्याने म्हटलंय की “हे विंचू अल्ट्राव्हायोलेट प्रकाशात अधिक स्पष्टपणे दिसतात.” अजून एकजण म्हणतो की “हे विंचू चीनचे देखील असू शकतात कारण तिथेच असे विचित्र प्रकार केले जातात. आणखी एका युजरने कमेंट करताना लिहिलंय की, “मला वाटत नाही की हे घर फक्त विंचवांसाठीचं आहे. तिथे विंचू पाळले जात असावेत” नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला यामुळे चांगलीच चालना मिळाली आहे. पण व्हीडिओने मात्र सर्वांच्या मोबईलमध्ये जागा मिळवलीय.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?