तरुणींच्या या 5 घाणेरड्या सवयी… पाहताच मुलं भडकतात; 5 वी सवय तर अत्यंत…
रिलेशनशिपमध्ये मुलींच्या काही सवयींमुळे मुलांवर ताण येतो. संशय घेणे, चिडवणे, सतत फोन वापरणे, अभिनय करणे आणि तुलना करणे या 5 सवयींमुळे मुले खूप भडकतात. यामुळे नात्यात गैरसमज वाढतात आणि वाद होतात. नातं टिकवण्यासाठी या सवयी टाळणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून प्रेम आणि विश्वास कायम राहील.

रिलेशनशीपमध्ये पार्टनरच्या वाईट सवयींचं नेहमी टेन्शन असतं. तरुण मुलं मुली बहुतेकदा एकमेकांना समजून घेत नाहीत. अनेकदा मुलं उघडपणे मुलींना आपल्या समस्या सांगत नाहीत. मुलींच्या काही सवयी त्रासदायक असतात, त्या सुद्धा मुलं त्या पाहिल्यावर भडकतात. पण वाद घालत नाहीत. वाद घालण्यापेक्षा शांत राहणं त्यांना योग्य वाटतं. त्यामुळे नात्यांमध्ये टेन्शन येतं आणि गैरसमजही होतो. मुलींच्या काही अशा घाणेरड्या सवयी आहेत, ज्यामुळे मुलांना त्रास होतो. त्या सवयी कोणत्या?
संशय घेणं
कोणतंही नातं विश्वासावर अवलंबून असतं. पण अनेक मुली मुलांवर संशय घेत असतात. त्यांची ती सवय असते. वारंवार मुलांचा फोन चेक करणं, मित्रांची नावं विचारणं, त्यांना वेगवेगळे प्रश्न करणं या गोष्टींमुळे मुलांना त्रास होतो. जीव नकोसा होतो. उगाचच संशय घेतल्याने त्यांची अडचण होते. मुलींच्या संशय घेण्याचा परिणाम असा होतो की एक वेळ अशी येते की मुलं सहनच करू शकत नाही. मग त्यांच्यात वाद होतात. आणि नात्याचा फियास्को उडतो.
चिडवणं
अनेक मुलींना मुलांना चिडवणं आवडतं. चिडवणं काही वाईट नाही. पण त्याला मर्यादा असते. उठसूट कोणत्याही गोष्टीवरून चिडवत बसल्यावर मुलांना राग येतो. चार चौघात चिडवलं तर ते अपमानास्पद वाटतं. कामात व्यत्यय आणणं, जुन्या चुका वारंवार सांगणं, खिल्ली उडवणं या गोष्टी मुलांना त्रासदायक वाटतात. त्यामुळे भांडणांना आयतच आमंत्रण दिलं जातं.
सातत्याने फोनचा वापर
आजच्या डिजीटल युगात सोशल मीडिया हा लाइफस्टाइलचा एक भाग झाला आहे. लोक वेगवेगळ्या कामासाठी फोनचा वापर करतात. पार्टनर सोबत असतानाही मुली फोनवरच बोलत असतील किंवा सोसल मीडियात मग्न असेल तर ते पार्टनरला आवडत नाही. मुलींचं फोनवर असणं मुलांना बिल्कूल आवडत नाही.
अॅक्टिंग करणं
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. पण मुली काही गोष्टींवर अधिक फोकस करतात. प्रत्येक गोष्टीचा बाऊ करतात. प्रत्येक छोट्या गोष्टीवर रडतात. इमोशनली ब्लॅकमेल करतात. असा सवयी मुलांना आवडत नाही. मुलींची ही अॅक्टिंग ज्याला नखरेही म्हणतात ते मुलं सहन करत नाहीत.
तुलना करणं
सर्वात वाईट सवय म्हणजे तुलना करणं. प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. स्वभाव वेगळा असतो. प्रत्येकजण वेगळ्या संस्कारातून, वर्गातून आलेला असतो. प्रत्येकाला एक वेगळं वातावरण मिळालेलं असतं, प्रत्येकाची कुवत आणि क्षमताही वेगळी असते, अशावेळी त्याची दुसऱ्याशी तुलना करणं योग्य नाही. मुलींना मात्र, मुलांची इतरांशी तुलना करायला आवडतं. त्यामुळे मुलांना कमीपणा आल्यासारखं वाटतं. आपल्यात काही तरी उणीव असल्याची गिल्ट त्यांना येत असते. त्यामुळेच मुलींची ही सवय मुलांना बिल्कूल आवडत नाही.