Gold-Silver Panipuri ! खाऊ की लॉकरमध्ये ठेवू ? सोन्या-चांदीची पाणीपुरी पाहून लोक अवाक्

हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्लॉगरने असा दावा केला आहे की, ही सर्वात हायजिनिक पाणीपुरी आहे. सोन्या-चांदीने मढवलेली ही पाणीपुरीची संकलप्न एकदम वेगळीच आहेत. ती कुठे खायला मिळेल ? चला जाणून घेऊया

Gold-Silver Panipuri ! खाऊ की लॉकरमध्ये ठेवू ?  सोन्या-चांदीची पाणीपुरी पाहून लोक अवाक्
सोन्या-चांदीची पाणीपुरी पाहिलीत का ? Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 4:03 PM

गोलगप्पा, पाणीपुरी, पुचका.. पदार्थ एक नावं मात्र अनेक.. पाणीपुरी ही डिश अशी आहे की ती न आवडणारा माणूस एखादाच असेल. पाणीपुरीचं नाव ऐकताच भल्याभल्यांच्या तोंडात पाणी येतं. तुमच्यासोबतही असंच होत असेल ना ? पण फ्युजनच्या नावाखाली कोणी आपल्या आवडत्या पाणीपुरीचा छळ करत असेल तर ? आजकाल, पाणीपुरीची अशीच एक विचित्र रेसिपी इंटरनेटवर आली जी पाहून लोकांचं डोकंच फिरलंय. त्याचा व्हिडीओ पाहून काही लोकांनी डोक्यावर हातच मारून घेतला. ‘भावा, आता ती पाणीपुरी तरी सोड की’, तिने काय बिघडवलं? अशा शब्दांत लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.  काय आहे हे प्रकरण, चला जाणून घेऊया.

एक काळ असा होता की पाणीपुरी म्हटलं की मसालेदार, आंबट आणि गोड पाणी आठवायचं. पण अहमदाबादच्या एका पाणीपुरी वाल्याने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या… बटाटे, रगडा आणि मसालेदार आंबट-गोड, तिखट असं पाणी घालण्यापेक्षा हा भाऊ तर ड्रायफ्रुट्स आणि थंडाई घालून पाणीपुरी विकत आहे. एवढंच नव्हे तर त्यावर सोनं-चांदी चिकटवून… हो , हे खरं आहे. याचाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जरी स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली गेली असली तरी, पाणीपुरी ती सोन्या-चांदीची, ऐकूनच कसंतरी वाटलं ना ! ही विचित्र रसिपी ऐकून लोकंही हैराण झाले आणि त्यावरून दोन गट पडले. काही लोकांना पाणीपुरी वाल्या भैय्याची ही कल्पना आवडली, पण काहींना तो प्रकार बिलकूल नाही आवडला. उगाच डोक्यावर चढवलं राव, अशी कमेंट लोकांनी हा व्हिडीओ पाहून केली.

अशी बनते सोन्या-चांदीची पाणीपुरी

सोन्या-चांदीच्या पाणीपुरीचा हा व्हिडीओ सध्या भलताच व्हायरल झालाय. एक दुकानदार बारीक कापलेले बदाम, काजू आणि पिस्त्याचे तुकडे पाणीपुरीच्या पुरीमध्ये टाकतो. त्यानंतर त्याची चव वाढवण्यासाठी तो त्यावर मध टाकतो. एवढं वाचूनच तुमचं डोकं फिरलं असेल, हो ना ? पण पुढे तर वाचा.. त्यानंतर तो दुकानदार पुरीमध्ये आंबटगोड चटणी, किंवा तिखट पाणी घालत नाही तर त्या पुरीमध्ये सरळ थंडाई ओततो. आणि ती पुरी सोन्या-चांदीच्या वर्खाने सजवतो.

सोन्या-चांदीच्या पाणीपुरीचा व्हिडीओ तर पहा

पाणीपुरीचा सत्यानाश केला…

इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्लॉगरने असा दावा केला आहे की, ही सर्वात हायजिनिक पाणीपुरी असून अशी पाणीपुरी तुम्ही कधीच खाल्ली नसेल. सोन्या-चांदीची ही पाणीपुरी तुम्हाला अहमदाबादमध्ये खायला मिळेल. पण ही पाणीपुरी प्रीमियम श्रेणीतील आहे. मात्र व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकं अवाक् झाले असून त्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. ‘ ही (पाणीपुरी) खायची की लॉकरमध्ये ठेवायची ते पण सांगा’ अशी कमेंट एकाने केली. तर ‘या पाणीपुरीचं नाव बप्पी लहरी पाणीपुरी असायला हवं होतं’ अश मजेशीर कमेंट दुसऱ्या यूजरने केली. ‘ (अशी पाणीपुरी) फ्री मिळाली तरी खाणार नाही. पाणीपुरीचा सत्यानाश केला’ असं लिहीत एका यूजरने त्याचा राग व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.