सरकारी शाळेतील फोटो व्हायरल! विद्यार्थ्यांचे शौचालय साफ करताना फोटो,कडक कारवाईचे आदेश

बरेचदा तर असे फोटो, व्हिडीओ आयएएस, आयपीएस अधिकारीच शेअर करताना दिसतात. सरकारी शाळेतले हे फोटो सध्या झपाट्याने व्हायरल होतायत.

सरकारी शाळेतील फोटो व्हायरल! विद्यार्थ्यांचे शौचालय साफ करताना फोटो,कडक कारवाईचे आदेश
Government School student cleaning toilets
Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 24, 2022 | 1:26 PM

सरकारी शाळेतले अनेक व्हिडीओ, फोटो व्हायरल होत असतात. चांगले, वाईट कसेही…! बरेचदा तर असे फोटो, व्हिडीओ आयएएस, आयपीएस अधिकारीच शेअर करताना दिसतात. सरकारी शाळेतले हे फोटो सध्या झपाट्याने व्हायरल होतायत. या फोटोमध्ये विद्यार्थिनी शौचालय साफ करताना दिसतायत. फोटो व्हायरल झाल्यावर लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय.

या फोटोंमध्ये मुली हातात झाडू, बादल्या आणि मग घेऊन गावातील प्राथमिक शाळेतील शौचालय साफ करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलंय की ही शाळा या मुली इयत्ता 5 वी आणि 6 वीच्या विद्यार्थिनी होत्या.

मध्य प्रदेशातील चकदेवपूर गावात असलेल्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या या विद्यार्थिनी साफसफाई करताना दिसून आल्यात. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात.

राज्याचे मंत्री सिसोदिया यांनी गुना जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. विद्यार्थ्यांनी हातात झाडू घेऊन हातपंपाच्या पाण्याने शौचालये साफ केल्याची छायाचित्रे स्थानिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिलेत.

दरम्यान एका वृत्तानुसार विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचे जबाब नोंदविण्यात आलेत. या जबाबात या सर्वांनी विद्यार्थ्यांना शौचालये साफ करण्यास सांगितले होते हे नाकारले आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या एका पथकानेही शाळेत जाऊन स्वतंत्र तपासणी केलीये. ‘आम्ही हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे,’ असे सांगून या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय