भर लग्नात त्याने अशी काय मागणी केली… नवरीने थेट नवरदेवाला झाडालाच बांधले, Video व्हायरल

या प्रकरणाची तक्रार मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी दोन्हीकडच्या लोकांना पोलिस ठाण्यात नेले

भर लग्नात त्याने अशी काय मागणी केली... नवरीने थेट नवरदेवाला झाडालाच बांधले, Video व्हायरल
| Updated on: Jun 16, 2023 | 10:52 AM

लखनऊ : हुंड्यासारखी वाईट प्रथा देशातून हळूहळू संपुष्टात येत असली तरी काही लोक आजही या छोट्या मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत. आजही अनेक जण हुंड्याची मागणी करून स्वत:चा सन्मान तर कमी करतातच, पण यामुळे हुंड्याच्या विरोधात असलेल्या पुरुषांचीही मान खाली जाते. मात्र अशा लोकांचे काय हाल होतात याचे ताजे उदाहरण नुकतेच प्रतापगडमध्ये पहायला मिळाले. येथे एका वराने (groom demands dowry) अशी मागणी केल्यावर लोकांनी त्याला ओलीस ठेवले होते.

ही घटना उत्तर प्रदेशातील प्रतापगडमधील मांधाता कोतवाली येथील हरखपूर गावातील आहे. ही घटना 14 जून रोजी घडली. खरंतर त्या दिवशी जौनपूर जिल्ह्यातील पुर्वा गावातून लग्नाची वरात आली होती. अमरजीत वर्मा असे वराचे नाव असून त्याने कुटुंबीय आणि मित्रांसह थाटामाटात मिरवणूक काढली. मुलीकडच्या लोकांनीही त्यांचे चांगले स्वागत झाले. सर्व काही नीट सुरू होतं, मात्र त्यानंतर मुलाने लग्नाच्या मध्येच हुंड्याची मागणी केल्याने मीठाचा खडा पडला.

वराने केली ती मागणी

भारतात हुंडा घेणे हा कायद्याने गुन्हा आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण तरीही या लग्नात वराने जेव्हा हुंड्याची मागणी केली तेव्हा मुलीच्या पालकांना धक्काच बसला. त्यांनी वरासह त्याच्या कुटुंबीयांनाही समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ते त्यांच्या मागणीवर अडूनच राहिले. त्यानंतर वधूकडच्या लोकांनी एक असे पाऊल उचलले, ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. त्यांनी वरासह सर्व कुटुंबियांना ओलीस ठेवले. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये लोक वराला झाडाला बांधताना दिसत आहेत. तोही गोंधळलेला आणि घाबरलेला दिसत आहे.

 

वराला झाडालाच बांधले

रिपोर्ट्सनुसार, लग्नात वर-वधू्ने एकमेकांना वरमाला घालण्याआधीच त्यांच्यात कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. तो वाद मिटतो न मिटतो तोच वराने लगेच हुंड्याची मागणी गेली . हे ऐकून वधूकडचे लोक भयंकर संतापले आणि त्यांनी वराला एका झाडाला बांधून ठेवले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी वराची सुटका केली. त्यानंतर पोलिसांनी वर आणि वधू अशा दोघांकडील लोकांना पोलिस ठाण्यात नेले. पण तेथेही हा वाद काही मिटू शकला नाही.