Video : मित्राने गालगुच्चे घेतले, नवरदेव संतापला, लग्नाच्या स्टेजवरच तुंबळ हाणामारी, पाहा व्हीडिओ…

हा व्हीडिओ Niranjan Mahapatra नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे.

Video : मित्राने गालगुच्चे घेतले, नवरदेव संतापला, लग्नाच्या स्टेजवरच तुंबळ हाणामारी, पाहा व्हीडिओ...
| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 3:11 PM

मुंबई : सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. अश्यात लग्नाचे वेगवेगळे व्हीडिओ व्हायरल (viral video) होत आहे. आताही लग्नाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात लग्नातील तुफान मारहाण बघायला मिळतेय. लग्नाचा हा मजेदार व्हीडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हीडिओमध्ये लग्नाच्या (wedding video) वेळी नवरा नवरी बसले आहेत. त्यांच्याभोवती नातेवाईकांचा गराडा पाहायला मिळत आहे. नवरदेवाच्या मागे त्याचा एक मित्र दिसतोय. तो त्याची खोड काढायला जातो. तो त्याचे गाल ओढतो. पुढे जे घडतं ते पाहून अनेकांना हसू आवरत नाहीये.

व्हायरल व्हीडिओ

लग्नाचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात लग्नातील तुफान मारहाण बघायला मिळतेय. लग्नाचा हा मजेदार व्हीडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. व्हीडिओमध्ये लग्नाच्या वेळी नवरा नवरी बसले आहेत. त्यांच्याभोवती नातेवाईकांचा गराडा पाहायला मिळत आहे. नवरदेवाच्या मागे त्याचा एक मित्र दिसतोय. तो त्याची खोड काढायला जातो. तो त्याचे गाल ओढतो. पुढे नवरदेव संतापतो आणि तो त्या मित्राला जबर मारहाण करतो. त्याचा हा असा अवतार बघून नेटकरी भलतेच हसत आहेत.

हा व्हीडिओ Niranjan Mahapatra नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं आहे. तर एक लाख 40 हजार लोकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवरीबाईंचा स्वॅगच न्यारा

लग्नात अश्याच काही भन्नाट गोष्टी घडत असतात. त्याचे व्हीडिओही समोर येतात. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.या व्हीडीओमध्ये लग्नातल्या हार घालण्याच्या विधीवेळी गंमत घडते.वधू आणि वर स्टेजवर उभे आहेत. यावेळी वधूच्या मैत्रिणी तिची चेष्टा करायला लागतात. तेव्हा ही नवरीबाई चिडते.तिचा हा सगळा राग तिच्या हार घालण्याच्या प्रक्रियेमध्ये दिसतो. ती रागात नवरदेवाच्या गळ्यात हार घालते. मग नवरदेवही तिच्या गळ्यात हार घालतो. पण तिचं त्याच्याकडेही लक्ष नसतं ती रागातच तिच्या या मैत्रिणींकडे पाहाते. यावेळी व्हीडिओ काढणारी व्यक्ती हॅपी बर्थ डे टू यू, असं म्हणते. विशेष म्हणजे नवरीच्या या चिडलेल्या व्हीडिओला तुम जब ऐसे शरमाती हो, हे गाणं बॅगराऊंडला लावलंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.