Ram Ram: प्रभू श्रीरामाचं अनोखं पेंटिंग! ‘राम’ हा शब्द 1 लाख 11 वेळा लिहिला

या पेंटिंगमध्ये इतकं खास काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही पेंटिंग खूपच हटके आणि खास आहे.

Ram Ram: प्रभू श्रीरामाचं अनोखं पेंटिंग! राम हा शब्द 1 लाख 11 वेळा लिहिला
Shriram painting
Image Credit source: Social Media
| Updated on: Nov 01, 2022 | 2:30 PM

इंटरनेटवर अनेक मजेदार, भावनिक आणि मनोरंजक व्हिडीओज असतात. असे व्हिडीओज जे आपल्याला तासंतास खिळवून ठेवू शकतात. एक व्हिडिओ ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे, तो म्हणजे रामाचं पेंटिंग बनवणाऱ्या एका कलाकाराचा. या पेंटिंगमध्ये इतकं खास काय आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ही पेंटिंग खूपच हटके आणि खास आहे. जोधपूरची कलाकार डॉ. शिवानी मंदाच्या जबरदस्त स्केचिंग स्टाईलची ऑनलाइन खूप चर्चा आहे. पेण्टब्रश किंवा रंगीत पेन्सिल वापरण्याऐवजी मंदाने देवनागरी लिपीत ‘राम’ हा शब्द एक लाख अकरा वेळा वारंवार लिहून एक पेंटिंग तयार केले.

रेखांकन पूर्ण करण्यासाठी या महिलेने विविध रंगीत स्केच पेनचा वापर केला आणि परिपूर्ण स्केच तयार केले.
हे चित्र रेखाटताना तिनं व्हिडीओ काढलाय.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यापासून त्याला 9.5 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला 1.1 मिलियन लाईक्स आणि अनेक कमेंट्स देखील आहेत. तिचे कौशल्य पाहून अनेक जण अवाक झालेत.

एका इन्स्टाग्राम कमेंटमध्ये एका युझरने लिहिले की, “उत्तम काम. आपल्या महान कार्याला सलाम. हे सोपं नाहीये. तुमच्या सहनशीलतेची कदर करतो,” आणखी एक व्यक्ती म्हणाली, “अतिशय, अतिशय सुंदर.

एक तिसरा माणूस म्हणाला, “काय प्रतिभा आहे. आणखी एका युझरने लिहिले, “व्वा, हे विलक्षण आहे.” इतर काही इन्स्टाग्राम युजर्सनी इमोजीचा वापर करून प्रतिक्रिया दिल्या आहेत.