Video | जगातील सर्वाधिक महागडा उंट पाहिलात का?, उंट खरेदीसाठी चक्क साडेचौदा कोटींची बोली

इस्लामांचा पवित्र महिना असलेल्या रमजानपूर्वी (Ramadan) सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) एक उंट (Camel) आतापर्यंतच्या सर्वाधिक महाग किमतीला विकला गेला आहे. या उंटावर लागलेली बोली ऐकूण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा उंट असल्याचे बोलले जात आहे.

Video | जगातील सर्वाधिक महागडा उंट पाहिलात का?, उंट खरेदीसाठी चक्क साडेचौदा कोटींची बोली
जगातील सर्वाधिक महागडा उंट
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 5:10 PM

इस्लामांचा पवित्र महिना असलेल्या रमजानपूर्वी (Ramadan) सौदी अरेबियामध्ये (Saudi Arabia) एक उंट (Camel) आतापर्यंतच्या सर्वाधिक महाग किमतीला विकला गेला आहे. या उंटावर लागलेली बोली ऐकूण तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. हा आतापर्यंतचा सर्वात महागडा उंट असल्याचे बोलले जात आहे. हा उंट तब्बल सात लाख सौदी रियाल भारतीय चलनामध्ये 14 कोटी 23 लाख 45 हजार 462 रुपयांना विकला गेला आहे. सौदी अरेबियाच्या एका स्थानिक न्यूज पोर्टल Al Mard ने याबाबत माहिती दिली आहे. या उटांच्या विक्रीसाठी लीलावाचे आयोजन करण्यात आले होते. या उंटाला खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. लिलावाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक सौदी अरेबीयन नागरिक आपल्या पारंपरीक पोषाखामध्ये दिसत आहे. तो उंटाची दोरी पकडून उभा आहे. त्यानंतर त्याने आपल्या जवळ असलेल्या मायक्रोफोनमधून या उंटावर बोली लावण्याचे आव्हान केले.

पहिल्यांदा साडेदहा कोटींची बोली

त्यानंतर या लिलावामध्ये या उंटावर सर्वप्रथम 5 मिलियन साऊदी रियाल म्हणजेच 10 कोटी 48 हजार 880 रुपयांची बोली लागली. ही बोली नंतर वाढत गेली. शेवटी हा उंट सात लाख सौदी रियालला विकला गेला. याची भारतीय चलनामध्ये 14 कोटी 23 लाख 45 हजार 462 रुपये इतकी किंमत होते. मात्र हा उंट कोणी घेतला. या उंटाचा खरेदीदार कोण होता? याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

उंट वाळवंटातील जहाज

तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता हा उंट लिलावासाठी सादर करण्यात आला आहे. या उंटाच्या आसपास सौदी अरेबियाचा पारंपरिक पोषाख घातलेले अनेक नागरिक उभा आहेत. ज्या उंटाचा लीलाव करण्यात आला तो उंट हा अत्यंत दुर्लभ प्रजातीचा माणण्यात येतो. या प्रजातीमधील उंट आपल्या सुंदरतेसाठी जगप्रसिद्ध आहेत. ज्या उंटाचा लीलाव करण्यात आला त्या प्रजातीचे खूप थोडे उंट आता जगात शिल्लक आहेत. सौदी अरेबियामध्ये पूर्णपणे वाळवंट आहे. उंटाला वाळवटांतील जहाज म्हटले जाते. त्यामुळे या देशात मोठ्या प्रमाणात दळणवळणासाठी तसेच अन्य कामांसाठी उंटाचा उपयोग होतो.

संबंधित बातम्या

Will Smith Chris Rock : विल स्मिथनं ख्रिस रॉकला ठोसा मारला काय… इकडे ट्विटरवर आला मीम्सचा महापूर

Snakes rare moments : कॅमेऱ्यात कैद नागांची प्रणयक्रीडा; वडाळ्यातला दुर्मीळ Video viral

…अन् काँग्रेस आमदार अमित झनक यांनी धरला ठेका, लग्नसमारंभातला Video viral

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.