संपूर्ण मालगाडी कुत्र्यावरून पण… ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ते थक्क!

व्हायरल होणारी ही क्लिप अवघ्या काही सेकंदाची आहे, पण ती पाहून कोणालाही भीती वाटेल.

संपूर्ण मालगाडी कुत्र्यावरून पण... ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ते थक्क!
dog viral video
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 20, 2023 | 5:59 PM

‘जाको राखे साइयां, मार सके ना कोय.’असं म्हटलं जातं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात संपूर्ण मालगाडी कुत्र्यावरून जाते, पण त्या प्राण्याला काहीच होत नाही. आता ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला, ते थक्क झाले आहेत. मात्र, हा व्हिडिओ कुठून आला आहे, हे समजू शकलेले नाही. व्हायरल होणारी ही क्लिप अवघ्या काही सेकंदाची आहे, पण ती पाहून कोणालाही भीती वाटेल.

एक कुत्रा रेल्वे रुळ ओलांडत असताना मालगाडी येते. व्हिडिओमध्ये कुत्रा मालगाडीखाली येताना दिसत आहे. हा कुत्रा यापुढे जिवंत राहणार नाही, असे लोकांना वाटत होते. पण, कदाचित त्याचे नशीब खूपच छान आहे.

आपण पाहू शकता की संपूर्ण मालगाडी त्यावरून जाते, परंतु त्या कुत्र्याला काहीच होत नाही. तोही न हलता ट्रॅकवर बसलाय. कदाचित त्यामुळेच तो बचावला असावा.

प्रिती पटेल नावाच्या एका युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, ‘देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल’. 36 सेकंदाची ही क्लिप वेगाने व्हायरल होत आहे.

या क्लिपला 8 हजारांहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे, तर डझनभर लाइक्स मिळाले आहेत. याशिवाय युजर्स कमेंट आणि शेअरही करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘देवाचे आभार तो पूर्णपणे ठीक आहे.’