Viral: राजकीय गदारोळ महाराष्ट्रात, मिम्समध्ये अमित शाह आणि मोदीजी! लोग भी हद कर देते है भई…

या सगळ्या गदारोळात नेटकरी काय करतायत. इतक्या महत्त्वाच्या वेळी ते नेमकी इंटरनेटवर काय शेअर करतायत. बघुयात लोकांनी शेअर केलेले भन्नाट मिम्स...

Viral: राजकीय गदारोळ महाराष्ट्रात, मिम्समध्ये अमित शाह आणि मोदीजी! लोग भी हद कर देते है भई...
लोकांनी शेअर केलेले भन्नाट मिम्स...
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 25, 2022 | 11:12 AM

मुंबई : राज्यात सत्ताधारी शिवसेनेमध्ये (Shivsena) दोन गट पडले असून त्यावरुन प्रचंड घमासान माजलंय. एकीकडे महाराष्ट्रातल्या राजकारणात सध्या खळबळ माजलीये. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) आपल्या सोबत एकूण 50 आमदार असल्याचा दावा केलाय. अशात राज्याच्या राजकारणात नवीन काय बदल होणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या प्रकरणात सक्रिय झालेत. भाजपकडून देखील हलचाली सुरू झाल्याचं दिसतंय. विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्रातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) तब्बल दहा तासांनंतर मुंबईत दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस दिल्लीत कुणाला भेटले, याबाबत अजूनही गुप्तता पाळली जातेय. पहिल्या फळीच्या नेत्यांना फडणवीस भेटले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईत कोअर कमिटीच्या बैठकीत ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेवर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, दुसरीकडे फडणवीस मित्र पक्षांसोबत चर्चा करणार असून ही चर्चा नेमकी कशाची असणार? सगळ्या नजरा आता महाविकासआघाडी आणि भाजप या पक्षांवर खिळल्या आहेत. या सगळ्या गदारोळात नेटकरी काय करतायत. इतक्या महत्त्वाच्या वेळी ते नेमकी इंटरनेटवर काय शेअर करतायत. बघुयात लोकांनी शेअर केलेले भन्नाट मिम्स…

1) पंतप्रधान आणि गृहमंत्री मुंबईत येतायत म्हणे…

नेटकऱ्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा एक फोटो शेअर केलाय. जो फोटो प्रचंड वायरल होतोय. फोटोत नरेंद्र मोदी आणि अमित शाह दोघंही आहेत ज्यात खाली लिहिलंय,”अगला स्टेशन मुंबई”. देशात अगदी कुठेही राजकारणात कुठलेही बदल झाले तर सगळ्यात जास्त मिम्स पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांवर केले जातात. सगळंच त्यांनी घडवून आणलं असं लोकांचं म्हणणं असतं. नेटकऱ्यांना काय मिम्स बनवायचे बहाणे हवेत…

2) अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंना सल्ला देताना…

3) एकनाथ शिंदे शिवसेनेकडे गाडी मागताना

4) उद्धव ठाकरे शरद पवारांना आपली व्यथा सांगताना…

एक मिम नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेअर केलंय ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांना, “मला खूप भीती वाटतीये” असं सांगतायत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या राजकारणात सगळ्यात जुनं असणारं प्रस्थ आहे. अनुभवी माणसाला दुःख नाही सांगणार तर कुणाला सांगणार? हीच गोष्ट विनोदात मांडण्यात आलीये. मिम्सच्या मदतीने…

5) राज्यपाल भगतसिंग कोश्यारी देवेंद्र फडणवीसांची वाट बघतायत…

नेटकरी कुणालाच सोडत नाहीत त्यांनी अगदी राज्यपालांना सुद्धा या सगळ्या गदारोळात सोडलेलं नाही. एक मिम बनवलंय ज्यात राज्यपाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची शपथविधीसाठी वाट बघतायत. हे मिम बनवण्यासाठी नेटकऱ्यांनी फिर हेराफेरी च्या डायलॉगचा आणि सीनचा वापर केलाय.

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)