AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Sanjay Raut: संजय राऊतांना राजकीय भूकंपाचे इंटरनेटवर हादरे! जिथं बघा तिथं निस्ते राऊत…

बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्यात ज्यात संजय राऊत यांची खिल्ली उडवली जातीये. अर्थात हा काही राग येण्याचा मुद्दा नाही, मिम्स हा एक मजेचा भाग आहे. मिम्सची मजा घेता आली पाहिजे.

Viral Sanjay Raut: संजय राऊतांना राजकीय भूकंपाचे इंटरनेटवर हादरे! जिथं बघा तिथं निस्ते राऊत...
संजय राऊतांना राजकीय भूकंपाचे हादरे! Image Credit source: संजय राऊतांना राजकीय भूकंपाचे हादरे!
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jun 23, 2022 | 12:45 PM
Share

मुंबईः संजय राऊत! महाविकासआघाडी (MahaVikasAghadi) सरकारचा बुलंद आवाज! तीन पक्ष एकत्र येण्यात, वेगवेगळे विचार एकत्र येण्यात संजय राऊतांचा फार मोठा वाटा असल्याचं म्हटलं जातं. महाविकासआघाडी सरकारला कुणीही धक्का लावू शकत नाही. सरकार पडणार नाही असं वारंवार सांगणारे संजय राऊत काल परवापासून मात्र फारसं काही बोलत नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे. संजय राऊत कुठे आहेत, संजय राऊतांचा आवाज बंद झाला की काय असं लोकंच इंटरनेटवर (Internet) म्हणतायत. बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्यात ज्यात संजय राऊत (Memes On Sanjay Raut) यांची खिल्ली उडवली जातीये. अर्थात हा काही राग येण्याचा मुद्दा नाही, मिम्स हा एक मजेचा भाग आहे. मिम्सची मजा घेता आली पाहिजे. राजकीय भूकंपांनंतर एकही पक्ष, एकही नेता या मिम्स पासून स्वतःचा बचाव करू शकलेला नाही. शिवसेना खासदार संजय राऊत कसे सुटतील यातून? पाहुयात संजय राऊतांवर शेअर करण्यात आलेले मिम्स…

1) संजय राऊत मुख्यमंत्र्यांना सल्ला देताना!

संजय राऊत जेव्हा उद्धव ठाकरेंना सल्ला देतात तेव्हा ते असा सल्ला देत असतील असं म्हणत लोकांनी एका सिनेमाचा सीन शेअर केलाय

2) संजय राऊतांना शकुनी मामा ची उपमा!

काही लोकांनी संजय राऊतांना शकुनी म्हणून संबोधलंय. महाभारतातला शकुनी मामा अशी उपमा त्यांनी संजय राऊतांना दिलीये.

3) महाभारतातले संजय राऊत आणि उद्धव ठाकरे

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो असलेलं एक मिम आहे. महाभारतात घडलेल्या घटनेवर आधारित हे मिम आहे. हे सुद्धा प्रचंड वायरल होतंय.

4) संजय जी जरा सांगा तिकडे काय चालू आहे…

संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंचा फोटो ज्यात उद्धव ठाकरे संजय राऊतला परिस्थितीचा अंदाज घ्यायला लावतायत…

5) दिल के अरमां आसुओं में बह गए

संजय राऊत या गाण्यावर पेटी वाजवतायत अशी एक पोस्ट व्हायरल होतीये. राजकीय भूकंपानंतर ही पोस्ट व्हायरल होतीये.

(आमचा कुठल्याही पक्षाला पाठिंबा नाही. बातमी मनोरंजाच्या हेतूने करण्यात आलेली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली