
आपण अनेकदा फिरायचे प्लॅनिंग करताना मुक्कामासाठी हॉटेल्सचे बुकींग करतो. यावेळी काही हॉटेल्सच्या नावासमोर स्टार दिलेले असतात. यावर १ स्टार, ३ स्टार, ५ स्टार असे स्टार्स नक्कीच पाहायला मिळतात. पण या हॉटेल्स हे स्टार रेटिंग कसे दिले जाते आणि त्यांच्यातील नेमका फरक काय असतो, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नाही ना… चला तर मग, आज आपण 1 स्टारपासून 7 स्टार हॉटेल्सपर्यंतच्या सुविधा आणि त्यांच्यातील फरकांबद्दल जाणून घेऊया. हॉटेल्सना स्टार रेटिंग कसे मिळते? हॉटेल्सना स्टार रेटिंग देताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. यामध्ये खोल्यांचा आकार, पुरवल्या जाणाऱ्या सुविधा, स्वच्छता, सेवांची गुणवत्ता आणि अनुभव यांचा समावेश असतो. तसेच यातील रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, स्पा, जिम, कॉन्फरन्स सुविधा आणि इतर सेवांवरून हॉटेलचे रेटिंग ठरवले जाते. अधिकृतपणे हॉटेल्सना 1 ते 5 स्टार असेच रेटिंग दिले जातात. 5 स्टारपेक्षा जास्त लक्झरी आणि खास सुविधा देणारी हॉटेल्स स्वतःला अनधिकृतपणे 7...