20,000 रुपयांच्या नोकरीवरून थेट 1.4 कोटींची कमाई! 22 वर्षीय तरुणाची स्टोरी सोशल मीडियावर Viral

सध्या एका 22 वर्षीय तरुणाची गोष्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे. त्याने अवघ्या २० हजार रुपयांच्या नोकरीवरून थेट १.४ कोटी रुपयांची कमाई करण्यापर्यंतचा प्रवास त्याने अवघ्या एका वर्षात पूर्ण केला आहे.

20,000 रुपयांच्या नोकरीवरून थेट 1.4 कोटींची कमाई! 22 वर्षीय तरुणाची स्टोरी सोशल मीडियावर Viral
| Updated on: Nov 13, 2026 | 10:19 AM

माणसाने काही करायचं ठरवलं आणि मेहनत घेतली तर माणूस काहीही मिळवू शकतो. छोट्या ठिकाणाहून येऊन मोठ्या गोष्टी करण्यासाठी मेहनत सोबत स्किल्सही आवश्यक आहे. फक्त 22 वर्षाच्या एका तरुणाने असंच काहीसं करून दाखवलं आहे. या तरुणाची वर्षांपूर्वी कमाई महिन्याला निव्वळ २० हजार रुपये होता. पण आता त्याने 1.4 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. त्याच्या या यशाची स्टोरी संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याने रेडीट या सोशल मीडियावर पोस्ट करून या स्टोरीबद्दल सांगितले आहे.

मोठ्या ठिकाणी शिक्षण नाही ना जॉब

Loading...

विशेष बाब ही आहे की, या तरुणाने ना प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घेतले, ना आपल्या करिअरच्या सुरुवातीला त्याला एखादी मोठी किंवा उच्च-पदस्थ नोकरी मिळाली. त्याने केवळ कठोर परिश्रम, नवनवीन स्किल्स आत्मसात करण्याची सवय आणि सतत प्रगती करण्याची जिद्द यांच्या जोरावर हे यश मिळवले. ‘रेडिट’ (Reddit) वर त्याने “वयाच्या २२ व्या वर्षी मी १.५ कोटी रुपये कसे कमावले” या हेडिंगची एक पोस्ट शेअर केली. त्यात त्याने सांगितले की, बारावी पूर्ण केल्यानंतर लगेचच त्याने काम करायला सुरुवात केली होती. त्या काळात तो एका सामान्य महाविद्यालयातून बीसीए पदवीचे शिक्षणही घेत होता आणि आपल्या अभ्यासासोबतच पूर्णवेळ नोकरीही सांभाळत होता.

स्किल्सच्या जोरावर कमावले 1.4 कोटी

त्या तरुणाने सुरुवातीच्या काळात पुस्तके आणि ऑनलाइन कोर्सेसच्या मदतीने ‘डायरेक्ट रिस्पॉन्स कॉपीरायटिंग’ शिकून घेतले. अनेक वर्षे त्याने कमी पगारावर काम केले, परंतु या संपूर्ण काळात त्याने शिकणे आणि स्वतःमध्ये सुधारणा करणे कधीही थांबवले नाही. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याने स्वतःला केवळ कॉपीरायटिंगपुरते मर्यादित ठेवले नव्हते. पुढे त्याने, मीडिया बाइंग, फनेल इकॉनॉमिक्स, प्रॉडक्ट रिसर्च आणि रिक्रूटमेंट यांसारखी स्किल्स शिकून घेतली. . यासोबतच, त्याने लिंक्डइनचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आणि अमेरिका व युरोपमधील क्लायंटसोबत काम करण्याच्या संधी शोधल्या. त्याच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्याला अमेरिकेतील एका सप्लिमेंट ब्रँडमध्ये ‘हेड ऑफ पेड सोशल’ हे पद मिळाले.

How i made 1.5 crores at 22
by
in
sidehustleIndia

ही कंपनी मार्केटिंग आणि जाहिरात क्षेत्राशी समबंधित काम सांभाळते. त्याने सांगितले की, कंपनीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून कंपनीला दरमहा ३.५ दशलक्ष डॉलर्सच्या महसुलापर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या कामावर कंपनीएवढी खुश झाली की, त्यांनी त्याचा पगार २५० टक्क्यांनी वाढवला. याव्यतिरिक्त, त्याच्या बोनस पॅकेजमध्येही सुधारणा करण्यात आली.

 

आपल्या कमाईबद्दल बोलताना, या तरुणाने नमूद केले की, त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या चार वर्षांत त्याचे सरासरी मासिक उत्पन्न सुमारे २०,००० रुपये होते. मात्र, केवळ गेल्या एका वर्षात त्याने १.४ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us