पतीच्या अफेअरने नातं बिघडण्याऐवजी आणखी सुधारलं; पत्नीनेच मान्य केली चूक

| Updated on: Jan 13, 2024 | 1:57 PM

विवाहबाह्य संबंधामुळे पती-पत्नीच्या नात्यात फूट येते. मात्र फ्लॉरिडामधील एक जोडपं याला अपवाद ठरलं आहे. पतीच्या अफेअरमुळे नातं आणखी सुधारल्याची कबुली या महिलेनं दिली आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, ते जाणून घ्या..

पतीच्या अफेअरने नातं बिघडण्याऐवजी आणखी सुधारलं; पत्नीनेच मान्य केली चूक
अजब ट्विस्ट! विवाहबाह्य संबंधामुळे सुधारलं पत्नीसोबतचं नातं
Image Credit source: Tv9
Follow us on

फ्लॉरिडा : 13 जानेवारी 2024 | आयुष्य हा काही सिनेमा नसतो. पण अनेकदा आयुष्यात अशा काही घटना घडतात, ज्या ऐकल्यानंतर किंवा पाहिल्यानंतर सिनेमा आणि आयुष्य यातला फरकच लक्षात येत नाही. अशाच एका घटनेनं अनेकांना चकीत केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे प्रकरण अमेरिकेतील फ्लॉरिडा इथलं आहे. वैवाहिक आयुष्यात जर जोडीदार विवाहबाह्य संबंधामुळे फसवणूक करत असेल तर अनेक प्रकरणांमध्ये ते नातंच संपुष्यात येतं. पती-पत्नीचा घटस्फोट होतो. मात्र फ्लॉरिडामध्ये घडलेल्या घटनेत पतीच्या अफेअरमुळे पती-पत्नीचं नातं पहिल्यापेक्षा अधिक सुधारलं आहे. हे ऐकायलाच अजब वाटतं ना? मात्र असंच घडलं आहे.

वैवाहिक आयुष्यात नात्यांची दोरी फार नाजूक असते असं म्हटलं जातं. ही नाती फार सांभाळून जपावी लागतात. एखादी चूक या नात्यांमध्ये कायमची कटुता आणू शकते. त्यातही पती-पत्नीचं नातं हे विश्वास आणि प्रामाणिकपणा या दोन गोष्टींवर सर्वाधिक आधारित असते. यात एकाही जोडीदाराने फसवणूक केली, तर दुसऱ्याला ते अजिबात सहन होत नाही. मात्र हा नियम प्रत्येक जोडीला लागू होईलच असं नाही. 45 वर्षीय चॅरिटी क्रेग आणि तिचा 40 वर्षांचा पती मॅट यांचं नातं त्याला अपवाद ठरलंय. पतीच्या अफेअरमुळे या दोघांचं नातं अधिक सुधारल्याचं म्हटलं जात आहे.

न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांच्या लग्ना वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. 2012 मध्ये जेव्हा चॅरिटीने तिच्या पतीचा फोन चेक केला, तेव्हा तिला समजलं की त्याचं बाहेर अफेअर सुरू आहे. याविषयी तिने थेट पतीला विचारणा केली असता त्यानेही कोणतंच कारण न देता अफेअरची कबुली दिली. दोन महिन्यांपासून एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्याने पत्नीला सांगितलं. हे ऐकताच चॅरिटीवर दु:खाचा डोंगर कोसळला आणि ती थेट घर सोडून निघून गेली.

हे सुद्धा वाचा

चॅरिटी आणि मॅट हे कॉलेजपासून एकमेकांना ओळखायचे. दोघं आधी एकमेकांचे खूप चांगले मित्र होते आणि या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं होतं. चॅरिटीने घर सोडल्यानंतर जवळपास आठ महिन्यांपर्यंत दोघं एकमेकांपासून लांब राहिले. यादरम्यान चॅरिटीने काऊन्सलिंगचा पर्याय निवडला. त्यातून तिला समजलं की, तिच्यात होणाऱ्या बदलांचा परिणाम वैवाहिक नात्यावर झाला होता. त्यामुळे नातं तुटल्याचं संपूर्ण खापर पतीवर फोडून चालणार नाही, हे तिला समजलं होतं. चॅरिटीला ही चूक कळताच तिने पतीची भेट घेतली. दोघांनी नात्याला पुन्हा एक संधी देण्याचं ठरवलं. काही प्रयत्नानंतर चॅरिटी आणि मॅट पुन्हा एकत्र आले. माध्यमांशी बोलताना चॅरिटीने सांगितलं की, “माझ्या पतीचं अफेअर सुरू नसतं तर आज आमचं नातं इतकं मजबूत झालं नसतं.”