IFS ने शेअर केला ओंडक्यातला भयानक पंजाचा फोटो, नेटकऱ्यांना विचारले हे काय ? उत्तराने हडकंप

सोशल मिडीयावर बरेचदा शेअर केलेल्या पोस्ट पाहून आपल्याला रोमांचित व्हायला होत असते. तर कधी अशा पोस्टच्या मजेशीर कॅप्शन वाचून लिहिणाऱ्यांच्या लेखणीला सलाम करू सारे वाटते. अशाच प्रकारे एका व्हायरल फोटोला पाहून तुम्हाला भीती वाटू शकते.

IFS ने शेअर केला ओंडक्यातला भयानक पंजाचा फोटो, नेटकऱ्यांना विचारले हे काय ? उत्तराने हडकंप
fingers
Image Credit source: fingers
| Updated on: Jan 17, 2023 | 3:26 PM

मुंबई : इंटरनेटवर काही अधिकारी सक्रीय असतात. इंडीयन फॉरेस्ट ऑफीसर असलेल्या IFS Samrat Gowda सम्राट गौडा यांनी एक वेगळाच फोटो शेअर केला आहे. या फोटोत जंगलातील लाकडाच्या ओंडक्यातून एका भयानक वाटणाऱ्या पंजाची बोटे डोकावताना दिसत आहे. इंटरनेट एक असे माध्यम आहे, जेथे काय पाहायला मिळेल हे सांगू शकत नाही. सोशल मिडीयावर बरेचदा भीतीदायक आणि रहस्यमय गोष्टी शेअर केल्या जात असतात. त्या पाहून आपल्याला रोमांचित व्हायला होत असते. कधी तर मजेशीर कॅप्शन वाचून लिहिणाऱ्यांच्या लेखणीला सलाम करू सारे वाटते. अशाच प्रकारे एका व्हायरल फोटोला पाहून तुम्हाला भीतीदायक वाटू शकते.

आयएफएस अधिकारी डॉ.सम्राट गौडा यांनी शेअर केलेल्या फोटोला पाहून तुमची बोबडी वळू शकते. यात लाकडात अडकलेली खतरनाक प्राण्याच्या पायाच्या बोटांचे पंजे दिसत आहेत. ही बोटे जांभळ्या रंगाची आहेत, तर नखांचा रंग काळा आहे. या झाडामागे एखादा राक्षसी प्राणी लपलाय असेच जणू वाटते आहे. वास्तविक हा फोटोत काय लपले आहे. असे विचारता अनेकांनी आपल्या परीने उत्तरे दिली आहेत. तर काहींनी हे काय आहे ते बरोबर ओळखले आहे.

या फोटोला कॅप्शन देताना डॉ. गौडा यांनी आपणाला ओळखता येईल का हे काय आहे. मग काय इंटरनेट युजरनी उत्तराचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. फार कमी लोकांना समजले आहे की हे काय आहे ते. या पोस्टला 1 लाख 30 हजार जणांनी लाईक पाहीले आहे. फोटो पाहून जंगलात भूतंही असतात अशी कमेंट काही जणांनी दिली आहे. तर काहींनी बरोबर सांगितले की ही एक प्रकारची बुरशी आहे जी मशरूमसारखी वाढते आणि तिला मृत माणसाची बोटे (Dead man’s fingers) म्हणतात. ही बुरशी मृत झाडांच्या किंवा वाळलेल्या झाडांच्या पायथ्याशी वाढतात. ती मातीच्या संपर्कातही आणि देठावरही वाढते. कॉन्ज्युरिंग या हॉरर चित्रपटातील भुतासारखी ही बुरशी दिसते असेही एकाने म्हटले आहे.