Elephant Viral Video: दरवाजा छोटा, हत्ती मोठा, झाली गफलत! बाहेर पडण्यासाठी हत्तीची धडपड तर बघा…

| Updated on: Sep 14, 2022 | 12:02 PM

व्हिडीओत एक जंगली हत्ती सावधपणे एका इमारतीबाहेर पडताना दिसतोय. तो या दरवाजाच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असल्याचे दिसतंय. हत्ती हळूहळू स्वतःला त्या दारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय.

Elephant Viral Video: दरवाजा छोटा, हत्ती मोठा, झाली गफलत! बाहेर पडण्यासाठी हत्तीची धडपड तर बघा...
Elephant Viral Video
Image Credit source: Social Media
Follow us on

Elephant Viral Video: प्राणी हे लहान मुलांसारखे असतात. कधी कधी त्यांना मस्ती करायचा खूप मूड असतो. हत्तीचे व्हिडीओ (Elephant Video) पाहिले तर खरंच हे एखादं लहान मूल आहे की काय असा प्रश्न पडतो.असाच एक हत्ती एका घरात शिरला. चविष्ट अन्न खायला घरात शिरला, बाहेर येताना घराच्या दरवाज्यात अडकून बसला. भारतीय वनसेवा अधिकारी सुशांत नंदा (Indian Forest Service Officer Sushant Nanda) यांनी ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट (Twitter Post) केला. व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.

व्हिडीओत एक जंगली हत्ती सावधपणे एका इमारतीबाहेर पडताना दिसतोय. तो या दरवाजाच्या चौकटीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असल्याचे दिसतंय. हत्ती हळूहळू स्वतःला त्या दारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय.

हत्ती खूप दूरवर असणाऱ्या अन्नाचा सुद्धा वास अगदी सहजपणे घेऊ शकतात. इतर कुठल्याही सस्तन प्राण्यांपेक्षा, कुत्रापेक्षाही जबरदस्त नाक हत्तीचं असतं. तो या घरात अन्नाच्या वासामुळेच शिरलेला आहे असं सुशांत नंदा आपल्या ट्विटर पोस्ट वर म्हणतायत.

व्हिडीओ

आयएफएस अधिकारी सुसंता नंदा यांनी आपल्या पोस्टमध्ये क्लिपची तारीख आणि स्थान नमूद केलेले नाही. आतापर्यंत 755 लाईक्स आणि अनेक कमेंट्ससह हा व्हिडिओ 10 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेलाय.

खूप सावधपणे हत्ती या घराच्या बाहेर पडतोय. घर पडू नये, घराला तडा जाऊ नये म्हणून तो ही काळजी घेतोय की काय असा प्रश्न पडतो. हे पाहून एका सोशल मीडिया युजरने कमेंट केली की, “संरचनेला विनाकारण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. नेहमी हुशारीने आणि नम्रतेने वागा”

दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, “हा उसाचा वास लांबूनच घेणारा विशाल, बुद्धिमान प्राणी आहे.” पण या सगळ्यात सगळ्या सोशल मीडिया युजर्सला हत्ती नेमकं काय खाण्यासाठी आत गेला होता ह्याची फार उत्सुकता आहे.