जगातला सर्वात महागडा रेडा पाहिलात का? त्याच्या किंमतीच्या ना गाड्या, कार, खातोही एवढं की मालक कंगाल होईल! वाचा सविस्तर

| Updated on: Feb 09, 2021 | 9:07 AM

हरियाणातील करनाल जिल्ह्यामध्ये तब्बल 9 कोटी रुपये किंमत असलेला एक रेडा आहे. (Haryana bull Yuvraj worth 9 crore)

जगातला सर्वात महागडा रेडा पाहिलात का? त्याच्या किंमतीच्या ना गाड्या, कार, खातोही एवढं की मालक कंगाल होईल! वाचा सविस्तर
Follow us on

चंदिगढ : कोरोडो रुपयांच्या गाड्या आपल्याला माहिती आहेत. किंमत कोटींमध्ये असल्यामुळे या गाड्यांमध्ये तशी सुविधाही असते. मात्र, रेड्याची किंमत कोटींच्या घरात असल्याचे कधी आपण ऐकलंत का? विश्वास बसणार नाही पण हरियाणातील करनाल जिल्ह्यामध्ये तब्बल 9 कोटी रुपये किंमत असलेला एक रेडा आहे. करनालमधील शेतकऱ्यांने या रेड्याला पाळले असून या रेड्याचे नाव ‘युवराज’ आहे. ( in Haryana the bull whose name is Yuvraj is worth of 9 crore)

करनाल जिल्ह्यातील कर्मवीर नावाच्या शेतकऱ्याकडे युवराज नावाचा तब्बल 9 कोटी रुपये किंमत असलेला एक रेडा आहे. अंगाने धष्टपुष्ट आणि दिसायलाही तेवढाच आकर्षक असल्यामुळे या रेड्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. कर्मवीर यांनी सांगितल्याप्रमाणे ते या रेड्याची जीवाच्या पलीकडे काळजी घेतात. हा रेडा 9 फूट लांब आणि 6 फूट उंच आहे. त्याचे वजन तब्बल 1500 किलो म्हणजेच 75 किलो वजन असलेल्या एकूण 20 लोकांईतके त्याचे वजन आहे.

प्रजाती सुधारण्यासाठी मोठी मदत

युवराज हा रेडा संपूर्ण हरियाणामध्ये प्रसिद्ध आहे. धष्टपुष्ट शरीर असल्यामुळे चांगल्या प्रजातीसाठी या रेड्याचा सर्सास उपयोग केला जातो. युवराज या रेड्याच्या विर्याला हरियाणामध्ये मोठी मागणी आहे. शेतकरी कर्मवीर हे या रेड्याचे विर्य प्रतिडोस 300 रुपये प्रमाणे विकतात. त्यांनी सांगितलेल्या माहितप्रमाणे रेड्याच्या एका वेळच्या विर्यातून 500 डोस तयार होतात. विशेष म्हणजे युवराजच्या विर्यापासून जन्माला आलेले रेडकूसुद्धा तेवढेच तंदुरुस्त असते. युवराजपासून जन्मलेल्या रेडकूचे वजन सामान्य रेडकूपेक्षा 15 ते 20 किलोंनी जास्त असते. तसेच, युवराजच्या विर्यापासून जन्मलेली म्हैस भविष्यात 18 ते 20 लिटर दूध देते. त्यामुळे युवराजला बाजारात तर मागणी आहेच. पण त्याचबरोबर युवराजपासून जन्मलेल्या रेड्यालासुद्धा तेवढाच भाव आहे.

जेवणासाठी दिवसाला 25 हजारांचा खर्च

युराजचे वजन तब्बल 1500 किलो असल्यामुळे त्याचा आहारही तेवढाच मोठा आहे. युवराजचे मालक शेतकरी कर्मवीर हे त्याच्या जेवणासाठी प्रतिमहीना 25 हजार रुपये मोजतात. युवराज दिवसभरात 10 किलोंच्या आसपास फळं खातो. तसेच त्याला दिवसभर हिरवा चारा आणि पौष्टिक अन्न दिले जाते. त्याच्या स्वच्छतेचीही तेवढीच काळजी घेतली जाते. कर्मवीर युवराजला दिवसभरातून तीन वेळा अंघोळ घालतात. तसेच मालीश केल्यानंतर त्याला रोज 5 किमीपर्यंत फिरवलं जातं.

दरम्यान, युवराजवर एका बाजरात 9 कोटी रुपयांची बोली लावली लागली होती. मात्र, त्याचे मालक शेतकरी कर्मवीर हे त्याला विकणार नसल्याचे सांगतात. कुणी 90 कोटी रुपये जरी दिले, तरी ते युवराजला विकणार नसल्याचे ते म्हणतात. तब्बल 1500 किलो वजनाच्या आणि 9 कोटी रुपये किंमत असलेल्या या युवराजची संपूर्ण भारतात चर्चा होत आहे.

इतर बातम्या :

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’, हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

( in Haryana the bull whose name is Yuvraj is worth of 9 crore)