Independence Day 2022: फाळणीत दोन भाऊ वेगळे झाले, 70 वर्षांनी त्यांची भेट झाली! यूट्यूबर म्हणतो आत्तापर्यंत 300 कुटुंबांना एकत्र आणलंय

| Updated on: Aug 15, 2022 | 12:01 PM

म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाली तेव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले. जातीय हत्याकांडात सिकाचे वडील आणि बहीण मरण पावले पण केवळ दहा वर्षांचा असलेला सादिक पळून पाकिस्तानात (India-Pakistan) पोहोचला.

Independence Day 2022: फाळणीत दोन भाऊ वेगळे झाले, 70 वर्षांनी त्यांची भेट झाली! यूट्यूबर म्हणतो आत्तापर्यंत 300 कुटुंबांना एकत्र आणलंय
India Pakistan Partition
Image Credit source: Social Media
Follow us on

पुनर्मिलन (Reunion) नेहमीच खास असते. अनेक वर्षांनंतर अचानक पुन्हा भेटल्यावर जो आनंद होतो तो ना गगनात मावणारा असतो आणि ना तो शब्दांत मांडण्यासारखा. 1947 मध्ये फाळणी (1947 Partition) नंतर जेव्हा सिका खान हा भारतीय आपल्या पाकिस्तानी भावाला पहिल्यांदा भेटला, तेव्हा त्याच्या सुरकुतलेल्या गालांवरून अश्रू ओघळत होते. सिका हा शीख मजूर होता. फाळणी झाल्यावर तो केवळ सहा महिन्यांचा असताना त्याचा मोठा भाऊ सादिक खान याच्याशी फारकत झाला. म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यात फाळणी झाली तेव्हा दोन्ही भाऊ वेगळे झाले. जातीय हत्याकांडात सिकाचे वडील आणि बहीण मरण पावले पण केवळ दहा वर्षांचा असलेला सादिक पळून पाकिस्तानात (India-Pakistan) पोहोचला.

यूट्यूबरने दोन विभक्त भावांची ओळख करून दिली

पंजाबमधील भटिंडा येथे आपल्या साध्या विटांच्या घरात राहणाऱ्या सिकाने सांगितले की, “माझ्या आईला हा आघात सहन झाला नाही आणि तिने नदीत उडी मारून आत्महत्या केली. मला लहान असल्यापासूनच गावकरी आणि काही नातेवाईकांत सोडून देण्यात आले होते, ज्यांनी मला वाढवले.” आपल्या भावाबद्दल अधिक जाणून घेण्याची सिकाची इच्छा लहान असल्यापासूनच आहे. तीन वर्षांपूर्वी या भागातील एका डॉक्टरने मदत केली. नासीर ढिल्लन यांच्या अनेक फोन कॉल्स आणि मदतीनंतर पाकिस्तानी यूट्यूबरने सादिकसोबत सिकाला पुन्हा एकत्र आणले.

300 कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्याचा दावा

38 वर्षीय नासीर म्हणतात की, त्यांनी आणि त्यांचा शीख मित्र भूपिंदर सिंग यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून 300 कुटुंबांना पुन्हा एकत्र आणले आहे. दोन्ही देशांमध्ये शत्रुत्व असले तरी 2019 मध्ये हा कर्तारपूर कॉरिडोर खुलं करून देण्यात आलं होतं. कर्तारपूर कॉरिडोरमध्ये या बांधवांची भेट झाली. व्हिसा-मुक्त क्रॉसिंग जे भारतीय शीख यात्रेकरूंना पाकिस्तानमधील मंदिराला भेट देण्यासाठी दिले जाते त्या माध्यमातून या भावंडांची भेट झाली.