AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांनो तुमच्या अपेक्षा तुम्हीच कळवा, आयोगाने उचलले मोठे पाऊल…

 ८ व्या वेतन आयोगाचा निर्णय केवळ प्रशासकीय डेटावर आधारे निर्णय न घेता कर्मचाऱ्यांच्या आणि संबंधित विभागांच्या प्रत्यक्ष गरजा आणि अपेक्षांवर घेणे सोपा जावा असा या वेबसाईट सुरु करण्याचा मागचा हेतू आहे.

8th Pay Commission : कर्मचाऱ्यांनो तुमच्या अपेक्षा तुम्हीच कळवा, आयोगाने उचलले मोठे पाऊल...
8th Pay Commission Website Launch Questionaire
| Updated on: Feb 07, 2026 | 11:28 PM
Share

केंद्र सरकारने 8 व्या वेतन आयोगासंदर्भातील प्रक्रिया औपचारिक रुपाने सुरु करताना याची अधिकृत वेबसाईट 8cpc.gov.in लाँच केली आहे. ही वेबसाईट सुरु करण्यामागे कर्मचाऱ्यांकडून आठव्या वेतन आयोगा संदर्भात हरकती आणि सूचना मागविण्यात येणार आहे. वेतन, पेन्शन आणि भत्त्याशी संबंधित प्रकरणावर मंत्रालय, विभाग, केंद्रीय कर्मचारी आणि पेशनर्स आणि हितसंबंधीतांकडून या सूचना मागवण्यात येणार आहेत.

८ वे वेतन वेबसाईटवर काय ?

८ वा केंद्रीय वेतन आयोगावर योग्य आणि संतुलित निर्णय घेणे सोपे जाण्यासाठी सर्व भागधारकांकडून हरकती आणि सूचना मागवणे यासाठी ही वेबसाईट उघडण्यात आली आहे. MyGov.in पोर्टलवर १८ प्रश्नांची एक प्रश्नावली उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रश्नावली भरुन आपल्या हरकती आणि सूचना पाठवायच्या आहेत.

 प्रश्नावली खालील वर्गासाठी खुली आहे –

मंत्रालय आणि विभाग

केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी

विधी अधिकारी आणि कोर्टाचे कर्मचारी

नियामक संस्थांचे अधिकारी/कर्मचारी

सेवेत असलेले आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना/यूनियन

पेन्शनर्स

संशोधक, शिक्षणतज्ज्ञ

सर्वसामान्य नागरिक आणि अन्य संबंधित हितचिंतक

ओळख गुप्त ठेवणार

प्रश्नावली भरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीची किंवा संस्थेची ओळख सार्वजनिकरित्या उघड केली जाणार नाही असे आयोगाने आश्वासन दिले आहे. सर्व उत्तरांचे एकत्रितपणे विश्लेषण केले जाईल आणि कोणत्याही वैयक्तिक प्रतिसाद देणाऱ्याची थेट ओळख जाहीर केली जाणार नाही. यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्यांचे मत मुक्तपणे आणि कोणत्याही दबावाशिवाय नि:संकोचाशिवाय मांडता येणार आहे.

अंतिम तारीख काय ?

८ व्या वेतन आयोगानुसार, ही प्रश्नावली भरण्याची शेवटची तारीख १६ मार्च २०२६ आहे.आयोगाने स्पष्टपणे केले आहे की सर्व सूचना फक्त MyGov पोर्टलद्वारे स्वीकारल्या जाणार आहेत. पीडीएफ स्वरूपात, ईमेल किंवा पत्राद्वारे दिलेल्या हरकती आणि सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत. संपूर्ण प्रक्रिया डिजिटल, पारदर्शक आणि करणे हे या मागचे उद्दिष्ट आहे. आठव्या वेतन आयोगाची स्थापना जानेवारी २०२५ मध्ये करण्यात आली आणि ३ नोव्हेंबर २०२५ रोजी अर्थ मंत्रालयाने अधिकृतपणे अधिसूचना काढली. आयोगाच्या कार्यक्षेत्राला, अटी आणि नियमांना मान्यता देण्यात आली आहे. आयोगाला त्याच्या शिफारसी तयार करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. आयोगाला राजधानीत एक कार्यालय देण्यात आले आहे आणि त्याची वेबसाइट सुरू झाल्यामुळे, त्याचे काम आता पूर्ण गतीने सुरू झाले आहे.

८  वा वेतन आयोग का महत्वाचा ?

८ वा केंद्रीय वेतन आयोग देशाच्या कोट्यवधी केंद्र कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महत्वाचा आहे. कारण यामुळे वेतनाचे स्ट्रक्चर, भत्ते आणि पेन्शनला नव्याने डिफाईन करण्यात येणार आहे. तसेच या ८ वा वेतन आयोगाच्या शिफारसींचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होणार आहे. आयोगाच्या प्रश्नावलीमध्ये वेतन आयोगाच्या निर्णयांचा आर्थिक परिणाम, महागाई, वित्तीय तूट आणि विकास खर्च यासारख्या मुद्द्यांवर आधारित प्रश्न समाविष्ट केले आहेत.

फिटमेंट फॅक्टर

सरकारी वेतन प्रणालीमध्ये फिटमेंट फॅक्टरचा उद्देश आणि त्याची तत्त्वे निश्चित कोणत्या तत्वाने निश्चित करावीत असाही प्रश्न यात विचारण्यात आला आहे. सचिवांसारख्या उच्च पदांची वेतन निश्चित करणे, कामगिरीवर आधारित वेतनाची रचना आणि वेगवेगळ्या वेतन स्तरांवर वार्षिक वाढीचा दर आणि वारंवारता यासारख्या संवेदनशील मुद्द्यांवरही भागधारकांकडून मते मागवण्यात आली आहेत.

अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!
अजितदादांचा घात की अपघात; संजय राऊतांच्या विधानाचीही चर्चा!.
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष
अंडर 19 वर्ल्ड कप जिंकल्यावर कॅप्टन आयुष्यच्या कुटुंबात मोठा जल्लोष.
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.