Nashik IT Company | मोठी बातमी! नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्या डेटाने खळबळ
नाशिक आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये महिलांचे गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त केले. या फोनमधून...
नाशिक आयटी कंपनीत अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित सहाही आरोपींचे मोबइल जप्त करण्यात आले आहेत. हे सर्व मोबाईल क्लोनिंगसाठी फॉरेन्सिक टीमकडे देण्यात आले आहेत. या जप्त मोबाइलमधून संशयितांचे कारनामे बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नाशिक शहरातील एका नामांकित मल्टिनॅशनल आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रयत्नांचे गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक आरोपींना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मिटींगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. तसेच काही कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत मानसिक छळ आणि आक्षेपार्ह टिप्पणी करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करण्यासाठी महिला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 7 महिला कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने वेषांतर करून कंपनीत प्रवेश केला. मिटींगदरम्यान आरोपींचे आक्षेपार्ह वर्तन प्रत्यक्षात आढळून आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने कारवाई करत आरोपींना अटक केली.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
'विभागत महिला नको म्हणून डावललं' मनिषा म्हैसरांचा महायुतीतील मंत्र्याव
इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?
भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना

