AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?

MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यात पंचांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक घटना समोर आली आहे. मोठी टीम म्हणून एक न्याय आणि दुसर्‍या टीमला वेगळा न्याय अशी सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. या मॅचमध्ये असं घडलं काय?.

MI vs RCB : हार्दिक पंड्या कॅप्टन म्हणून वेगळा नियम का? असा भेदभाव का, चौथा अंपायर कुठे होता? त्याला दिसलं नाही का हे?
Hardik Pandya Image Credit source: PTI
| Updated on: Apr 13, 2026 | 9:40 AM
Share

कुठल्याही खेळात नियम सर्वांसाठी समान असला पाहिजे. पण आयपीएल 2026 मध्ये असं दिसत नाहीय. त्यामुळे टुर्नामेंटच्या निष्पक्षेतवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. आयपीएल 2026 मध्ये एका सेम चुकीसाठी वेगवेगळे निर्णय दिसून आले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्यावेळी चौथा अंपायर कुठे होता? असा प्रश्न आता विचारला जातोय. एका सेम चुकीसाठी वेगवेगळे निर्णय का? 24 तासात नियम कायदा बदलला का?. RCB vs MI सामन्यात चौथा अंपायर नव्हता का? जर होता तर 24 तास आधी CSK vs DC सामन्यात जो निर्णय दिला तसाच निर्णय मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यात का दिला नाही?. चेन्नई विरुद्ध दिल्ली सामन्यात फोर्थ अंपायरने ओव्हर्स दरम्यान ग्लोव्हज बदलण्याच्या फलंदाजाच्या निर्णयाला चुकीचं ठरवलं होतं. मुंबई विरुद्ध बंगळुरु मॅचमध्ये मग काय झालं? तिथे हाच नियम का लावला नाही?

चेन्नईमध्ये CSK vs DC सामन्यात ट्रिस्टन स्टब्सला फोर्थ अंपायरने ग्लोव्हज बदलण्यापासून रोखलं होतं. दिल्लीच्या इनिंगमध्ये 19 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडलेली. हाताला घाम आल्यामुळे स्टब्सचे ग्लोव्हज निसटत होते. त्यामुळे बॅटवर त्याला ग्रिप पकडता येत नव्हती. त्यामुळे 19 व्या षटकात त्याला ग्लोव्हज बदलायचे होते. पण अंपायरने त्याला असं करु दिलं नाही. त्यावरुन दिल्लीचे कोच आणि डग आऊटमध्ये बसलेला खेळाडू नितीश राणाने अंपायर बरोबर खूप वाद घातला.

फोर्थ अंपायरने त्याला कुठेही टोकलं नाही

जर, दिल्लीच्या खेळाडूला ओव्हर्स दरम्यान ग्लोव्हज बदलण्यापासून रोखलं जातं. मग तोच नियम मुंबई इंडियन्सला का लावला जात नाही?. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सामन्यात ओव्हर्स दरम्यान ग्लोव्हज बदलताना दिसला. पण फोर्थ अंपायरने त्याला कुठेही टोकलं नाही. ओव्हर्स दरम्यान ग्लोव्हज बदलू शकत नाहीत हा जर नियम असेल मग असे दोन वेगवेगळे निर्णय का?

ओव्हर संपल्यानंतर हे केलं जात

क्रिकेटच्या नियमानुसार ओव्हर सुरु असताना तुम्ही ग्लोव्हज बदलू शकत नाही. खेळाडू अनेकदा घामामुळे ग्लोव्हज काढून पुन्हा घालतात किंवा दुसरे ग्लोव्हज घेतात. ओव्हर संपल्यानंतर हे केलं जात. ओव्हर चालू असताना ग्लोव्हज फाटले तर बदलता येतात. ते ही चौथ्या अंपायरची परवानगी घेऊनच तुम्ही ग्लोव्हज बदलू शकता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...