AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले

सध्या सर्वत्र ‘गंदी बात’ या सीरिजमधील अभिनेत्री चांगलीच चर्चेत आहे. या अभिनेत्रीने सर्वांसमोर युजवेंद्र चहलने पाठवलेले मेसेज दाखवले आहेत. या मेसेजमध्ये युजवेंद्रने व्हिडीओसोबतच काही लिहिले असल्याचे दिसत आहे.

युझवेंद्र चहलने ते व्हिडीओ पाठवत मेसेज केला; ‘गंदी बात’ अभिनेत्रीने सर्वांसमोर चॅटच दाखवले
Yuzi and TanyaImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 13, 2026 | 9:50 AM
Share

युजवेंद्र चहल हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. तर काही अभिनेत्रींनी युजवेंद्रने सोशल मीडियावर मेसेज केल्याचा दावा केला आहे. आता आयपीएलच्या धमाकेदार माहौलमध्ये एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर एकदम खळबळ माजवली आहे. युजवेंद्रने एका अभिनेत्रीला व्हिडीओ पाठवले होते. त्या अभिनेत्रीने युजवेंद्रने केलेले मेसेज सर्वांसमोर दाखवले आहेत.

‘गंदी बात’ फेम अभिनेत्री तान्या चटर्जीने युजवेंद्र चहलबाबत एक दावा केला आहे, ज्यानंतर इंटरनेटवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. युजवेंद्रने तिला काही व्हिडीओ पाठवल्याचे सर्वांसमोर सांगितले आणि फोनमधील चॅट दाखवले. या संपूर्ण प्रकरणाने सोशल मीडियावर चर्चेला अधिक वेग दिला आहे. प्रत्येकजण आपली मते मांडताना दिसत आहे. फॅन्समध्येही उत्सुकता वाढली असून, अधिक माहिती समोर येण्याची प्रतीक्षा आहे. सध्या हा मुद्दा वेगाने व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

तान्या चटर्जी यांचे म्हणणे आहे की, युजवेंद्र चहलने तिला इंस्टाग्रामवर डायरेक्ट काही व्हिडीओ शेअर करत ‘क्यूट’ म्हटले होते होतं. अभिनेत्री म्हणाली की, ती चहलला वैयक्तिकरित्या ओळखत नव्हती, त्यामुळे हे मेसेज तिच्यासाठी खूप आश्चर्यकारक होते. नुकताच पापराझींशी बोलताना तान्या चटर्जीने ही बाब उघडपणे सांगितली आणि तिने ते मेसेजही दाखवले. या मेसेजमध्ये चहलने तान्याला काही तिचेच व्हिडीओ पाठवले आहेत आणि ‘क्यूट’ म्हटले आहे. आता सध्या सोशल मीडियावर तान्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

तान्या चॅटर्जीचा हा व्हिडीओ समोर आल्यावर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. काही युजर्स याला सामान्य संभाषण मानत आहेत, तर अनेकांनी याला चुकीचे ठरवत चहलला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही लोकांनी तान्या चटर्जीवर पब्लिसिटी स्टंट करण्याचा आरोप लावला आहे, तर अनेक जण चहलकडून स्पष्टीकरणाची मागणी करत आहेत. या प्रकरणाने फॅन्सना दोन गटांत विभागले आहे.

चहलची अद्याप प्रतिसाद नाही

सद्यस्थितीत या वादावर युजवेंद्र चहलकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. त्यामुळे फॅन्स आता त्याच्या उत्तराची वाट पाहत आहेत. प्रश्न असा आहे की, हा फक्त एक सामान्य मेसेज होता की, याला जाणूनबुजून वाढवण्यात आले आहे.

Follow Us
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम
जमत नसेल तर मी उपोषणाला बसतो; जरांगेंचा सरकारला थेट अल्टिमेटम.
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज
मान्सूनचे आगमन लांबणीवर?; हवामान खात्याने सांगितला धक्कादायक अंदाज.
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर
नफ्याच्या हव्यासाने घेतले 14 जीव! विषारी दारूकांडामागचं काळं सत्य समोर.
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
तुळजापुरात खुलेआम मटक्याचा बाजार!; सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल.
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न.....
NEET घोटाळ्यावर सुप्रीम कोर्टाचे NTA ला थेट प्रश्न......
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर..
मनोज जरांगे पाटलांच्या भेटीपूर्वी विखे पाटलांचं मोठं विधान, उपोषणावर...
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार
मोठी बातमी! मविआत जागावाटपावर शिक्कामोर्तब कोणता पक्ष किती जागा लढवणार.
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक
14 जणांच्या मृत्यूनंतर रोहित पवार आक्रमक!; दारू अड्ड्यावर थेट धडक.
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?
महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला फायनल; कोणाच्या वाट्याला किती जागा?.
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली
राज्यसभेवर भुजबळांची नजर?; तिकीटासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली.