
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा बाजार झपाट्याने वाढत असून कमी बजेटमध्ये चांगली इलेक्ट्रिक कार घेण्याचा पर्याय आता ग्राहकांसमोर उपलब्ध झाला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणपूरक पर्यायांची गरज लक्षात घेता अनेकजण EV कारकडे वळताना दिसत आहेत.

मात्र, किंमत, रेंज आणि फीचर्स याबाबत अजूनही अनेक ग्राहकांमध्ये संभ्रम आहे. सध्या भारतीय बाजारात MG Comet EV ही कमी बजेटमध्ये चांगला पर्याय ठरत आहे. ही कार शहरातील दैनंदिन वापरासाठी फायदेशीर आहे.

सध्या देशातील सर्वात स्वस्त मास-मार्केट EV म्हणजे MG Comet EV. तिची सुरुवातीची किंमत सुमारे ₹7.50 लाख (एक्स-शोरूम) आहे. विशेष म्हणजे BaaS (Battery as a Service) योजनेअंतर्गत ही कार केवळ ₹4.99 लाखांपासून उपलब्ध होते. ज्यामुळे ती अधिक परवडणारी ठरते.

MG Comet EV ही खास करून शहरातील गर्दीच्या रस्त्यांसाठी डिझाइन करण्यात आली आहे. तिचा कॉम्पॅक्ट आकार, बॉक्सी डिझाइन आणि स्मार्ट फीचर्स यामुळे ती तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

अरुंद गल्ली, पार्किंगची अडचण असलेली ठिकाणे किंवा रोजच्या ऑफिसच्या प्रवासासाठी ही कार अतिशय सोयीची ठरते. या कारमध्ये 17.3 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर ती सुमारे 230 किमी रेंज देते. याशिवाय, फास्ट चार्जिंगची सुविधा असल्यामुळे चार्जिंगसाठी जास्त वेळ थांबण्याची गरज भासत नाही.