AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात Google वर ‘या’ भारतीय क्रिकेटरबद्दल सर्वाधिक करतात सर्च; नाव वाचून व्हाल थक्क!

पाकिस्तानात गुगलवर सर्वाधिक काय सर्च केलं जातं, याचा रिपोर्ट नुकताच गुगलकडून जाहीर करण्यात आला आहे. 2025 या वर्षभरात पाकिस्तानात एका भारतीय क्रिकेटरबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. त्या क्रिकेटरचं नाव वाचून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!

पाकिस्तानात Google वर 'या' भारतीय क्रिकेटरबद्दल सर्वाधिक करतात सर्च; नाव वाचून व्हाल थक्क!
भारतीय क्रिकेटपटूImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 10, 2025 | 11:57 AM
Share

Pakistan Google Trends 2025: सध्या थिएटरमध्ये सुरू असलेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानबद्दल चर्चा होऊ लागली आहे. भारताचा शेजारील देश पाकिस्तानात राहणारे लोक गुगलवर सर्वाधिक काय सर्च करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? नुकतंच गुगलने पाकिस्तान गुगल सर्च ट्रेंड्सबद्दलची माहिती दिली आहे. क्रिकेट, खेळाडू, लोकल न्यूज, टेक्नॉलॉजी, रेसिपी आणि ड्रामा यांसारख्या विविध कॅटेगरीमध्ये पाकिस्तानातील लोक काय सर्वाधिक सर्च करतात, याबद्दलची माहिती या सर्च ट्रेंड रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

विविध कॅटेगरीमधील Top Searches

  • क्रिकेटमध्ये सर्वाधिक Pakistan vs South Africa
  • Athletes मध्ये सर्वांत जास्त Abhishek Sharma
  • स्थानिक बातम्यांमध्ये सर्वांत जास्त Punjab Socio-Economic Registry
  • टेक्नॉलॉजीमध्ये सर्वांत जास्त Gemini
  • रेसिपीमध्ये सर्वांत जास्त Sandwich Recipes
  • How To Searches मध्ये सर्वांत जास्त How to check e-challan Karachi
  • ड्रामामध्ये सर्वांत जास्त Sher

टेक्नॉलॉजी ट्रेंड्सबद्दल बोलायचं झालं तर पाकिस्तानमधल्या लोकांनी जेमिनायशिवाय डीपसीक, गुगल एआय स्टुडिओ आणि आयफोन 17 यांनाही सर्वाधिक सर्च केलंय. आयफोन 17 टॉप सर्चमध्ये असल्याचं पाहून हे स्पष्ट होतंय की पाकिस्तानमध्ये परिस्थिती कशीही असली, महागाई कितीही असली तरी पाकिस्तानी लोक स्वत:ला ट्रेंडनुसार अप टू डेट ठेवण्यापासून मागे हटत नाहीत. टॉप 5 मध्ये जेमिनाय, तमाशा, डीपसीक, मायको आणि On4t यांचा समावेश आहे. How to Searches कॅटेगरीमध्ये चलान कराचीशिवाय How to see unsent Instagram messages, How to do car insurance, How to invest in crypto market आणि How to invest in stock market याबद्दल सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे.

क्रिकेट ट्रेंड्सबद्दल बोलायचं झाल्यास पाकिस्तानमध्ये जरी Pakistan vs South Africa सर्वाधिक सर्च करण्यात आला असला तरी टॉप 5 मध्ये Pakistan Super League, Asia Cup, Pakistan vs India आणि Pakistan vs New Zealand हेसुद्धा सर्वाधिक सर्च करण्यात आलं आहे. तर Athletes विभागात भारतीय स्टार क्रिकेटपटू अभिषेक शर्माशिवाय Hassan Nawaz, Irfan Khan Niazi, Sahibzada Farhan आणि Muhammad Abbas टॉप 5 मध्ये आहेत.

Follow Us
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी
अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
Amit shah Pune Visit | अमित शाहांच्या आगमनाची जय्यात तयारी तर पहा! व्हिडीओ आला समोर
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले
LIVE मेळाव्यात घडलं अनपेक्षित! अमित ठाकरे भरसभेत बोलताना भाषणच विसरले... Video होतोय व्हायरल