Arvind Goyal: 50 वर्षात कमावलेली 600 कोटींची संपत्ती दान केली; भारतातील उद्योगपती डॉ.अरविंद कुमार गोयल यांचा अभिमानास्पद निर्णय

| Updated on: Jul 21, 2022 | 3:59 PM

गोयल यांनी त्यांची 600 कोटींची संपत्ती दान केली असून स्वत:कडे फक्त मुरादाबाद येथील एक घर ठेवले आहे. 600 कोटींचीआयुष्यातूी संपत्ती कमावण्यासाठी गोयल यांनी आयुष्यातील तब्बल 50 वर्षे अथक परिश्रम केले. सोमवारी रात्री गोयल यांनी संपत्ती दान करण्याची घोषणा केली. 25 वर्षापूर्वीच मी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता असे गोयल यांनी सांगीतले.

Arvind Goyal: 50 वर्षात कमावलेली 600 कोटींची संपत्ती दान केली; भारतातील उद्योगपती डॉ.अरविंद कुमार गोयल यांचा अभिमानास्पद निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : एका हाताने केलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये अशी म्हण आपल्याकडे आहे. मात्र, अनेक जण दुसऱ्यांना दान करतानाच्या प्रसंगांना इव्हेंटचे रुप देतात विशेषत: भारतीय राजकारणी याचे उत्तम उदाहरण आहेत. मात्र, भारतातील उद्योगपती डॉ.अरविंद कुमार गोयल(Dr. Arvind Kumar Goyal ) यांनी एक अभिमानास्पद निर्णय घेऊन सर्वांनाच अचंबित केले आहे. 50 वर्षात कमावलेली 600 कोटींची संपत्ती दान( donet) करण्याचा निर्णय गोय यांनी घेतला आहे. सर्व संपत्ती दान करुन राहण्यासाठी म्हणून त्यांनी फक्त एक घर स्वत:जवळ ठेवले आहे. संपत्ती दान करण्याच्या त्यांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटूंबियांनी देखील पाठिंबा दिला. गोयल कुटुंबियांच्या या दानशूर पणाची सर्वत्र चर्चा आहे.

25 वर्षापूर्वीच घेतला होता संपत्ती दान करण्याचा निर्णय

गोयल यांनी त्यांची 600 कोटींची संपत्ती दान केली असून स्वत:कडे फक्त मुरादाबाद येथील एक घर ठेवले आहे. 600 कोटींचीआयुष्यातूी संपत्ती कमावण्यासाठी गोयल यांनी आयुष्यातील तब्बल 50 वर्षे अथक परिश्रम केले. सोमवारी रात्री गोयल यांनी संपत्ती दान करण्याची घोषणा केली. 25 वर्षापूर्वीच मी संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता असे गोयल यांनी सांगीतले.

दान केलेली रक्कम थेट राज्य सरकारकडे सोपवली

अरविंद गोयल यांनी दान केलेली रक्कम थेट राज्य सरकारकडे सोपवली आहे, जेणेकरून नियोजनबद्ध पद्धतीने गरजू लोकांना मदत पोहचू शकेल. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यातील 100 हून अधिक शिक्षण संस्था, वृद्धाश्रम आणि रुग्णालयातचे गोयल हे ट्रस्टी आहेत. करोना महामारीमुळे संपूरण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला होता. या काळात मुरादाबाद येथील 50 गावांना त्यांनी दत्तक घेतले होते.

तिन्ही मुलांनी दिला संपत्ती दान करण्याच्या निर्णयाला पाठिंबा

पत्नी रेणू आणि दोन मुलं आणि एक मुलगी असा डॉ.गोयल यांचा कुटूंब परिवार आहे. मोठा मुलगा मधुर गोयल मुंबईत राहतो. तर लहान मुलगा प्रकाश गोयल मुरादाबाद येथेच राहून वडिलांना मदत करतो. मुलीचे लग्न झाले असून तीचे सासर बरेली येथे आहे. सर्व संपत्ती दान करण्याच्या गोयल यांच्या निर्णयाला कुटुंबातील सर्वांनी पाठिंबा दिला.

संपत्ती दान करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विशेष समितीची नियुक्ती

संपत्ती दान करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी योग्य रितीने व्हावी यासाठी गोयल यांनी विशेष समितीची तयार केली आहे. संपत्ती योग्य किमतीत विकण्यासाठी गोयल यांनी पाच सदस्यांची समिती नेमली आहे. यातील तीन सदस्य स्वत: गोयल नियुक्त करतील. दोन सदस्य सरकारचे असतील. मी जिवंत असतानाच संपत्ती योग्य व्यक्तींच्या हातात गेली पाहिजे. जेणेकरून अनाथ आणि गरीब लोकांना मदत होईल. संपत्ती दान करण्यासाठी मी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहले आहे, ते पुढील कारवाई करतील असे गोयल म्हणाले.

का घेतला संपत्ती दान करण्याचा निर्णय

25 वर्षापूर्वी डिसेंबरमध्ये थंडीच्या महिन्यात ट्रेमधून प्रवास करत होते. तेव्हा त्यांना एक व्यक्ती थंडीत कुडकुडत असलेला दिसला. त्यांनी त्यांचा बूट त्या व्यक्तीला दिला. यानंतर त्यांनी गरीबांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते गरीबांना मदत करत आहेत.

कोण आहेत डॉ.अरविंद कुमार गोयल

अरविंद कुमार गोयल यांचे वडिल प्रमोद कुमार आणि मां शकुंतला देवी स्वतंत्र्य सैनिक होते. स्वातंत्र्य संग्राम लढ्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते.