रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी घडलं; गुजरातच्या विद्यार्थ्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बुक केली प्रयव्हेट कार

वडोदा वरून सुटणारी त्याची ट्रेन सुनिश्चित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजले त्यांनी तात्काळ एकता नगर ते वडोदरा यादरम्यान एक खाजगी कार बुक करून सत्यमच्या जाण्याची व्यवस्था केली. एकतानगर ते वडोदरा हे अंतर 85 किमी इतके आहे. अवघ्या दोन तासात सत्य वडोदराला पोहोचला. यामुळे त्याला चेन्नईला जाणारी त्याची ट्रेन मिळू शकली.

रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही तरी घडलं; गुजरातच्या विद्यार्थ्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी बुक केली प्रयव्हेट कार
| Updated on: Jul 16, 2022 | 10:18 PM

गुजरात: रेल्वेचा डीसाळा कारभार आणि रेल्वे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा अनुभव अनेक प्रवाशांनी घेतला आहे. मात्र गुजरात मधील एका विद्यार्थ्याला रेल्वे कर्मचाऱ्यांनी(Indian Railways ) असा सुखद अविस्मरणीय अनुभव मिळाला आहे जो तो आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. पुरामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असताना रेल्वे प्रशासनाने या विद्यार्थ्याला त्याच्या परीक्षा केंद्रावर निश्चित वेळेवर पोहोचवले आहे. ट्रेन बंद असताना विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रावर पोहोचवण्यासाठी रेल्वेने जे काही केले आहे याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वे अधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्याला मदत केली आहे. या विद्यार्थ्याने त्याच्यासोबत झालेला अनुभव सोशल मीडियावर एका व्हिडिओद्वारे शेअर केला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि त्यांनी केलेल्या मदतीमुळे मी वेळेवर कॉलेजला पोहचू शकलो असे म्हणत विद्यार्थ्याने रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.

ट्रने बंद असताना रेल्वे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्याला वेळेवर पोहचवण्याचा निर्णय घेतला

देशभरात अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसाचा फटका गुजरात राज्यालाही बसला आहे. गुजरात मध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. परिणामी अनेक एक्सप्रेस ट्रेन रद्द झाल्या आहेत. रेल्वे ट्रॅक तुटल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी चक्क कार बुक करून या विद्यार्थ्याला नियोजित वेळेत पोहोचवले आहे. सत्यम गढवी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. रेल्वेने केलेल्या या मदतीमुळे सत्यम अचंबित झाला आहे

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत सत्यमने आपल्या या स्पेशल जर्नीचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आहे. सत्यम हा IIT मद्रासचा विद्यार्थी आहे. तो गुजरातच्या वडोदराजवळील एकता नगर येथील राहणारा आहे. त्याचे कॉलेज चेन्नईला आहे.

गुजरातहून चेन्नईला जाण्यासाठी त्याने ट्रेनचा बुकिंग केलं होते. एकतानगरहून रेल्वेने प्रवास करत वडोदरा स्टेशनवरुन त्याला चेन्नई साठी ट्रेन पकडायची होती. मात्र, एकता नगर ते बडोदरा दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडे गेल्याने अनेक रेल्वे कॅन्सल झाल्या आहेत.

विद्यार्थ्यासाठी बुक केली प्रायव्हेट कार

मात्र, वडोदा वरून सुटणारी त्याची ट्रेन सुनिश्चित वेळेत सुटणार असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांना समजले त्यांनी तात्काळ एकता नगर ते वडोदरा यादरम्यान एक खाजगी कार बुक करून सत्यमच्या जाण्याची व्यवस्था केली. एकतानगर ते वडोदरा हे अंतर 85 किमी इतके आहे. अवघ्या दोन तासात सत्य वडोदराला पोहोचला. यामुळे त्याला चेन्नईला जाणारी त्याची ट्रेन मिळू शकली.

वि्दयार्थ्याने सोशल मिडीयावर शेअर केला अनुभव

13 जुलै रोजी हा सर्व वेगळा अनुभव सत्यमला आला. यानंतर त्याने एक व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रेल्वे कर्मचारी रेल्वे प्रवाशांची किती आत्मीयतेने काळजी घेतात हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे असे म्हणत सत्यमेव रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. अनेकांनी रेल्वेचे देखील आभार मानले आहेत.