Video : प्रवाशांनी 30 हजार फूट उंचीवर साजरी केली दिवाळी! इंडिगोच्या पायलटने प्रवाशांना दिलं खास सरप्राइज

हजारो फूट उंचावर दिवाळी साजरी करण्यात आली. पण दिवाळी दिव्यांची नव्हती. हजारो फूट उंचावर दिवाळी साजरी करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Video : प्रवाशांनी 30 हजार फूट उंचीवर साजरी केली दिवाळी!  इंडिगोच्या पायलटने प्रवाशांना दिलं खास सरप्राइज
diwali in plane
Image Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 12, 2026 | 11:39 AM

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण, नकारात्मकतचेच्या अंधारातून दूर जाऊन सकारात्मकतेचा प्रकाश पसरवावा हा मेसेज देणार हा सण आहे. आपण इथे दिवाळी साजरी केली. पण काही लोकांनी अशा ठिकाणी दिवाळी साजरी केली आहे. ज्यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. हजारो फूट उंचावर दिवाळी साजरी करण्यात आली. पण दिवाळी दिव्यांची नव्हती. हजारो फूट उंचावर दिवाळी साजरी करण्यात आली आणि त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला.

इंडिओ विमानाचे कॅप्टन प्रदिप कृष्णन यांनी प्रवाशांसाठी हा खास क्षण तयार केला. विमान प्रवास सुरू असताना त्यांनी विमानातील प्रवाशांशी संवाद साधला. सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पायलटचा हा अंदाज पाहून प्रवासी भारावून गेले. त्यानंतर पायलटने विनंती करत सर्वांना आपापले मोबाईल काढून प्लॅशलाईट सुरू करायला सांगितले. पायलटची ही कल्पना ऐकताच विमानातील प्रवाशांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला. एकामागोमाग एक मोबाईलचे टॉर्च सुरू झाले. काही क्षणातंच विमानाचां संपूर्ण केबिन या छोट्या प्रकाशाने उजळून निघाले. नेहमीच्या प्रवासात अचानक दिवाळीचा माहोल तयार झाला.

Loading...

 

 

 

मिठाई खा, पण ती प्रोटीनमध्ये बदलू दे!

या सेलिब्रेशनची आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे कॅप्टन प्रदीप कृष्णन यांनी दिलेला दिवाळीचा संदेश, त्यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडीयावर शेअर केला आहे. त्याच्यासोबत कॅप्शनमध्ये त्यांनी भन्नाट शुभेच्छाही दिली आहे. ‘आज जी काही मिठाई खाल, ती जादूने प्रोटीनमध्ये बदलू दे, अशी मजेशीर इच्छा त्याने लिहीली आहे. तसेच सर्वांनी आनंदात राहा, भरपूर खा. मज्जा करा असंही म्हटलं आहे.

नेटकऱ्यांनी पायलटच्या कल्पनेचं केलं कौतुक

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर अनेकांनी त्या इंडिगो विमानाच्या कॅप्टन प्रदीप यांच्या या कल्पनेचं कौतुक केलं आहे. एका युजरने ‘माझ्या आवडत्या कॅप्टन दिवाळीच्या शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्याने ही कल्पना छान असल्याचं म्हटलं आहे. खरं तर दिवाळी साजरी करण्यासाठी मोठी सजावट किंवा महागड्या वस्तूंची गरज नसते. कधी कधी अशी छोटीशी कल्पना फक्त अनेकांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us