Video : मुलांनी अजगराची बनवली घसरगुंडी! Video पाहून नेटकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला
लहान मुलांना खेळण्यासाठी काय काय वापरतील याचा काही अंदाज नसतो. पण या मुलांनी चक्क अजगराला आपलं खेळणं बनवलं आहे आणि मोठ्या माणसे मुलांचा हा खेळ मोबाईलमध्ये शूट करण्यात व्यस्त आहेत. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

लहान मुलांना खेळण्यासाठी काय आवडेल याचा काही नेम नाही. पण या मुलांनी खेळण्यासाठी असं काही निवडलंय जे पाहून कोणाच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. कारण या मुलांनी चक्क एका महाकाय अजगरलाच आपली घसरगुंडी बनवली आहे. त्याच्या भल्यमोठ्या शरीरार बसायचं आणि खाली घसरायचं असा प्रकार त्या मुलांचा चालू होता. विशेष म्हणजे आजूबाजूला असणारी लोक या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत होती.
या व्हिडिओमध्ये इंडोनेशियातील काही मुलं एका मोठ्या सापाच्या शरीरावर चढताना दिसतात. त्यानंतर त्याच्या शरीरावरून घसरत खाली येतात. काही मुलं त्याच्या अंगावर चक्क बसलेली दिसत आहेत. तर काही त्याच्या आसपास धावतही आहेत. व्हिडिओतील हा साप अजगर असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा जगातील सर्वात लांब प्रजातींपैकी एक आहे. त्याची लांबी साधारण 6 मीटर म्हणजेच जवळपास 20 फूट असते. हा साप विषारी नसतो मात्र त्याच्या शरीरात प्रचंड ताकद असते. तो आपल्या भक्ष्याला वेटोळं घालून घट्ट पकडतो. त्यामुळे तो विषारी जरी नसला तरी धोकादायक असतो.
मुलं खेळत होती, मोठी माणसं व्हिडिओ बनवत होती
या संपूर्ण घटनेतील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे मुलांच्या आजूबाजूला काही माणसंही उभी आहेत. ती माणसं मुलांचा हा खेळ मोबाईलमध्ये शूट करत आहेत. मात्र या व्हिडिओबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे काही वृत्तांनुसार हा अजगर कुटुंबाच्या परिचयाचा किंवा पाळीव असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एका वृत्तात मुलांच्या वडिलांनी या अजगराला शांत आणि माणसांची सवय असलेला असल्यांचं सांगितल्याचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वरून शेअर करण्यात आला आहे.
नेटकऱ्यांमध्ये दोन गट
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी मुलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. तर काहींनी हा अजगर माणसांच्या सहवासात वाढलेला असावा, असा अंदाज व्यक्त केला.