AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष…हसन मुश्रीफ यांचा शिंदे गटासहित महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, मनातलं सगळं सांगितलं

हसन मुश्रीफ यांचा शिंदे गटासहित महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. हसन मुश्रीफ यांच्या विधानाने महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची समोर आलं आहे.

अजितदादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्ष...हसन मुश्रीफ यांचा शिंदे गटासहित महाविकास आघाडीवर गंभीर आरोप, मनातलं सगळं सांगितलं
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 12, 2026 | 12:01 PM
Share

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोरदार चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंडळी विलिनीकरणावर भाष्य करत आहेत.  यामुळे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत हालचालींना वेग आला आहे. परंतु दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण माझ्याशी चर्चा केल्यानंतर होणार नाही, असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तर सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचे 20-22 आमदार फुटणार असल्याची भीती व्यक्त केली आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी संजय राऊतांची चांगलीच कानउघडणी केली. तर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी देखील राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भाष्य केलं. आता यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी शिंदे गटासहित महाविकास आघाडीच्या नेत्यांवर तीव्र शब्दात टीका केली. आमच्या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडीवर टीका केली. हसन मुश्रीफ म्हणाले, ते सातत्याने वक्तव्य करत आहेत. त्यांना मी विनंती करणार आहे की, त्यांनी आमच्या पक्षावर वक्तव्य करू नये. त्यांनी अशी वक्तव्य करून आमच्या पक्षात नाक खुपसू नये, अशी विनंती संजय राऊतांना करेन. त्यानंतर संजय शिरसाट हे सुद्धा वाईट पद्धतीने राष्ट्रवादीवर टीका करत आहेत. ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. समन्वय पक्षात तीन पक्षाची समिती आहे. त्यात चर्चा होते. महायुतीत एकमेकांवर बोलायचं. काही तक्रारी असतील, तर एकमेकांच्या कानावर घालायच्या. हे अनेक वेळा झालं. तरी हे बोध घेत नाही. एकनाथ शिंदे यांनी या नेत्यांना कडक शब्दात समज दिली पाहिजे. महायुतीत खडा टाकण्याचा प्रकार संजय शिरसाट आणि त्यांचे अनेक नेते करत आहेत. त्यांनी यापासून लांब राहावे. तिन्ही पक्षात वाद होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे’.

राष्ट्रवादीचा तिसरा गट स्थापन होणार का, यावर ते म्हणाले, असं अजिबात होणार नाही. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात सर्व आमदार एकसंघ आहोत. एकही आमदार कुठे जाणार नाही. तिसरा गट होण्याची शक्यता नाही. अजितदादांचा मुख्यमंत्री होण्याचा प्लान होता का, यावर ते म्हणाले,  काँग्रेसच्या नेत्याने काय बोलावं, हे आम्ही सांगू शकत नाही. परंतु त्यात काही तथ्य नाही. फार चुकीचं वक्तव्य आहे. विलिनीकरणाबाबतची चर्चा आताच समजली. मी आठवडाभर गोकुळच्या निवडणुकीत व्यग्र होतो. त्यामुळे मुंबईला गेलो नाही. मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला नाही. या प्रकरणावर सुनेत्रा पवार यांनी योग्यवेळी निर्णयाची माहिती देऊ, असं त्यांनी म्हटलं आहे.  याबाबत शरद पवार आणि सुनेत्रा पवार निर्णय घेतील. निर्णय दोन्ही नेते ठरवतील. सुनेत्रा पवारांच्या निर्णयामागे ठाम उभू राहू.  आता मुंबईला गेल्यानंतर नेतेमंडळी आणि सुनेत्रा पवारांशी चर्चा करेल. त्यानंतर मी यावर भाष्य करेल’.

आमदारांच्या शरद पवारांच्या भेटीच्या चर्चेवर ते म्हणाले, ‘मी राष्ट्रवादीचा आमदार आहे, परंतु शरद पवारांना भेटण्याविषयी कोणी सांगितले नाही. कोणते  आमदार भेटणार , याची देखील कल्पना नाही.  विरोधकांनी विनाकरण बदनामी करू नये. एका पक्षाचा नेता विमान अपघात गेला. त्या पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे. त्यांचा डाव कधी यशस्वी होणार नाही. आगामी निवडणुकांमध्ये सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत चांगली कामगिरी करताना दिसेल’.

Follow Us
गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजे...
MNS On Chhath Puja : गणपती विसर्जनाला निर्बंध, मग छठपूजेला पायघड्या का? बदलापुरात छठपूजेवरून मनसे आक्रमक
महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, राऊतांचा..
Sanjay Raut : महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आक्रमण करण्याचा प्रयत्न करू नका, संजय राऊतांचा इशारा; भोजपुरी गाण्यांवरून सरकारला सवाल
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात