रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे “X” मार्क असतं, का असतं ते? माहितेय?

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे हे "X" चिन्ह असणं बंधनकारक आहे.

रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे X मार्क असतं, का असतं ते? माहितेय?
Train X sign
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 16, 2022 | 5:00 PM

दररोज लाखो लोक ट्रेनमध्ये प्रवास करतात. रेल्वे स्टेशनवर जाताना किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील, पण त्यांचा अर्थ काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ट्रेनशी संबंधित अशाच काही गोष्टी जाणून घेऊयात. ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे मोठ्या आकारात ‘X’ मार्क असतो, हे तुम्ही पाहिलंच असेल. हे चिन्ह बनवण्याचं महत्त्वाचं कारण काय आहे, जाणून घेऊया त्याबद्दल.

बहुतांश प्रवाशांनी रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे ‘X’ मार्क पाहिले असतील. रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची ही खूण केलेली असते. भारतीय रेल्वेच्या नियमानुसार प्रत्येक पॅसेंजर ट्रेनच्या शेवटच्या डब्यामागे हे चिन्ह असणं बंधनकारक आहे.

याशिवाय रेल्वेच्या डब्याच्या मागील बाजूस ‘एलव्ही’ लिहिलेलेही तुम्ही पाहिले असेल. याचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.

ट्रेनच्या डब्यामागे बनवलेली ‘X’ ही खूण म्हणजे एक कोड आहे, जो सुरक्षा आणि सुरक्षेच्या उद्देशाने बनवलेला आहे. मात्र, त्याचे अनेक अर्थ निघू शकतात.

रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे ‘X’ नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की, ट्रेनमध्ये काही समस्या आहे किंवा गाडीचा डबा शिल्लक आहे.

डब्यामागे ‘एक्स’ दिसत नाही तेव्हा रेल्वे कर्मचारी सतर्क होतात. पण आता हे जाणून घेतल्या नंतर प्रवासी म्हणून रेल्वेच्या शेवटच्या डब्यामागे ‘X’ पाहून तुम्हाला आता नक्कीच आनंद होईल. कारण याचा अर्थ तुमच्या ट्रेनमध्ये सगळं व्यवस्थित आहे.

‘X’ मार्क असलेल्या बोर्डासोबतच एक बोर्ड असतो ज्यावर एलव्ही लिहिलेलं असतं. LV म्हणजे लास्ट व्हेइकल. म्हणजे शेवटचा डब्बा.

‘X’ मार्क असलेला एलव्ही रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेचा शेवटचा डबा असल्याचे सूचित करतो. रेल्वेच्या शेवटच्या डब्यात जर LV लिहिले नसेल तर त्याचा अर्थ असा होतो की, शेवटचा डबा रेल्वेशी जोडलेला नाही.