VIDEO | चिमुकल्याच्या सुंदर आवाजाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर..

VIRAL VIDEO | सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक लहान मुलगा गाणं गात आहे. त्याचा आवाज इतका सुंदर आहे की, नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.

VIDEO | चिमुकल्याच्या सुंदर आवाजाने जिंकलं नेटकऱ्यांचं मन, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर..
the boy singing song
Image Credit source: tv9marathi
| Updated on: May 13, 2023 | 7:40 AM

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) आपल्याला रोज असंख्य व्हायरल व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. त्यामध्ये काही व्हिडीओ असे असतात की, लोकांना अधिक आवडतात. लोकं आपला दिवस चांगला घालवण्यासाठी अशा पद्धतीचे अनेक व्हिडीओ शोधत असतात. सध्याचा व्हायरल व्हिडीओ त्या पद्धतीचा असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. एका लहान मुलाच्या आवाने संपुर्ण सोशल मीडियाला वेडं लावलं असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नेटकऱ्यांनी त्या पोराचं इतकं कौतुकं केलं आहे की, आम्ही शाळेत असताना आमच्याकडून अशा पद्धतीचं कोणतंचं कृत्य झालं नसल्याचं नेटकऱ्यांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियाच्या (trending video) विविध प्लॅटफॉर्मवरती व्हायरल झाला आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्या मुलाने शाळेची कपडे घातली आहेत. तो मुलगा आपल्या शिक्षिकेच्या सांगण्यावरुन आवडतं गाणं म्हणतं आहे. त्यावेळी त्याच्या शिक्षिकेने हा व्हिडीओ तयार केला आहे. त्या मुलाचा आवाज इतका सुंदर आहे की, लोकांनी त्याला डोक्यावर घेतलं आहे. त्याने जे गाणं म्हणलं आहे त्याचे बोल ‘तू मान मेरी जान मैं तुझे जाने ना दूंगा’ हा व्हिडीओ अजून व्हायरल होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे.

या व्हिडीओ मागच्या चार दिवसात अधिक व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ r_h_chauhan नावाच्या व्यक्तीकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. हा मुलगा आपल्या सुंदर आवाजाने लोकांचं मनोरंजन करीत आहे. हा व्हिडीओ तुम्ही ऐकला तर जरी ऐकला तरी तुम्ही सुध्दा पुन्हा-पुन्हा पाहणार एवढं मात्र नक्की. प्रत्येकजण त्या मुलाचं कौतुक करीत आहे.

हा व्हिडीओ २० मिलियन लोकांनी पाहिला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर २० मिलियन लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओला दोन करोडपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे. व्हिडीओ पाहिल्यापासून अनेकांनी त्या मुलाचं कौतुक केलं आहे. त्या व्हिडीओला ३० हजारपेक्षा अधिक लोकांच्या कमेंट आल्या आहेत. एका व्यक्तीने लिहीलं आहे की, आवाज किती भारी आहे. एका नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, मुलाच्या आवाजाने मला रडवलं आहे.