AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iphone 15 साठी ग्राहक दुकानदार यांच्यात तुफान राडा, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Iphone 15 Sellers And Customers Fight : Iphone 15 खरेदीवरुन दोन तरुणात राडा झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेवटी दोघांमध्ये सुरु असलेल्या हाणामारी पोलिसांनी सोडवली आहे.

Iphone 15 साठी ग्राहक दुकानदार यांच्यात तुफान राडा, मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Iphone 15 Sellers And Customers FightImage Credit source: tv9 marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 25, 2023 | 11:14 AM
Share

नवी दिल्ली : (Iphone 15) आयफोन मोबाईलची विक्री सुरु झाल्यापासून खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली आहे. आता त्याच्या खरेदीसाठी लाथा-बुक्क्यांची मारहाण (Iphone 15 Sellers And Customers Fight) झाली आहे. विशेष म्हणजे ही मारहाण भारतात झाली आहे. दिल्लीच्या (Delhi) कमला नगर मार्केटमध्ये हा वाद झाला आहे. दुकानदाराकडून ग्राहकाला मोबाईल देण्यास उशिर केल्यामुळे हा वाद झाला आहे. हा वाद बोलण्यातून इतका वाढत गेला की, मोबाईलच्या दुकानात हाणामारी सुरु झाली. त्यावेळी तिथं असलेल्या लोकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, ग्राहक आणि दुकानाचा चालक या दोघांमध्ये हाणामारी सुरु आहे. या दोघांचं भांडणं पाहून तिथं लोकं जमा झाली आहे. त्याचबरोबर त्यातली काही लोकं हे भांडण सोडवण्यासाठी दुकानात घुसली आहेत.या भांडणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यापासून लोकं विविध प्रकारच्या कमेंट देत आहेत. दिल्ली पोलिसांनी दोघांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करायला सुरुवात केली आहे. आयफोन विक्रीला उशिर झाल्यामुळे दोघांच्यात तुफान राडा झाला आहे.

लोकं सांगत आहे की, आयफोनच्या विक्रीला उशिर झाल्यामुळे ग्राहकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना चांगलीचं मारहाण केली आहे. ज्यावेळी ग्राहकाने मारहाण केली, त्यानंतर कर्मचाऱ्याने सुध्दा मारहाण केली. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एक्स वरती शेअर करीत असताना लिहीलं आहे की, दिल्लीतील कमला नगर परिसरातील iPhone 15 दुकानात ही मारामारी झाली आहे. दोघांच्यावरती पोलिसांनी कारवाई केली आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत