iPhone langer : प्रसाद म्हणून मिळणार iPhone 18? पंजाबमध्ये अनोख्या लंगरची चर्चा, अशी होणार विजेत्यांची निवड
नुकताच iPhone 18 pro max लाँच झाला आहे. पंजाबमधील एका इन्फ्लूएसरने आयफोन फुकट वाटण्याची घोषणा केली आहे. चंदीगड आणि मोहावी मधील लोकांना लकी ड्रॉच्या माध्यमातून सर्वांसमोर iPhone देण्यात येणार आहे.

लंगर म्हटलं की डोळ्यासमोर गरमागरम जेवण, प्रसाद किंवा किंवा एखादा पदार्थ दिसतो. पण पंजाबमध्ये सध्या लंगरचं एक भन्नाट रूप सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. इथे जेवण नाही तर थेट iPhone वाटण्याची घोषणा करण्यात आली आहे. राजा डी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले व्यावसायिक आणि सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर राकेश त्रेहान यांने iPhone लंगरची घोषणा केली त्यानंतर सोशल मीडियावर या अनोख्या उपक्रमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
येत्या २२ सप्टेंबरला चंदीगड आणि मोहालीमधे हा iPhone लंगरचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या लंगरसाठी पत्रकार आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या संख्येने या लंगरला येण्याचे आवाहन केले आहे. सर्वांसमोरच iPhone नागरिकांना मोफत दिले जाणार आहेत.
या आयफोन लंगरमध्ये iPhone 16 दिसणारच नाही आहेत. iPhone 16 पेक्षा नवीन मॉडेल्स महागडे फोन नागरिकांना फुकट दिले जाणार आहे. यामधे iPhone 18 iPhone 18 Pro Max याचा देखील समावेश असू शकतो.
या उपक्रमासाठी चंदीगड आणि मोहालीमधील निवडक लोकांमधून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. विजेत्यांची नावे लकी ड्राच्या माध्यमातून निवडली जाणार आहेत.म्हणजेच कोणाला iPhone दिला जाणार हे नशिबावर आणि लकी ड्रॉवर ठरणार आहे. यासाठी राकेश त्रेहानने जवळपास १००० iPhone खरेदी केल्याची घोषणा केली आहे.
लंगरचे आयोजन तर करण्यात आले आहे मात्र याला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मोठ्या संख्येने लोक जमा होऊन गर्दी किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने ही परवानगी नाकारली आहे.